Advertisement

बिनकामाचे भोंगे... मी काडीची किंमत देत नाही, उद्धव ठाकरेंचा राज यांना टोला

सर्व घडामोडींवर आतापर्यंत मौन बाळगलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर टीका केली आहे.

बिनकामाचे भोंगे... मी काडीची किंमत देत नाही, उद्धव ठाकरेंचा राज यांना टोला
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यांसंबंधी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. या सर्व घडामोडींवर आतापर्यंत मौन बाळगलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर टीका केली आहे.

‘एकच सामायिक कार्ड’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) सुविधेचे लोकार्पण सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राणा दांपत्यावर निशाणा साधला.

“ज्यांच्या पोटात अॅसिडीटी झाली आहे, आगडोंब उसळला आहे, जळजळतंय, मळमळतंय काही कळत नाही. पण त्यांनी त्यांच्या राज्यातल्या किती राजधान्यांमध्ये, शहरांमध्ये मुंबईच्या शाळेचा दर्जा अंगीकारुन दाखवला आहे हे दाखवावं असं माझं आव्हान आहे. काम काहीच नाही आणि बिनकामाचे भोंगे वाजवायचे हाच त्यांचा उद्योग असून मी काडीची किंमत देत नाही,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर निशाणा साधला.

“लवकरच मी एक जाहीर सभा घेणार आहे. हल्ली सभेचं पेव आहे. सगळ्यांचा सोक्षमोक्ष मला लावायचा आहे. जे नकली व तकलादू हिंदूत्ववादी आले आहेत, मला त्यांचा समाचार घ्यायचा आहे आणि तो लवकरच घेणार,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

यावेळी राणा दाम्पत्यावर सुद्धा त्यांनी टीका केली. “साधु संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी म्हण आहे. पण आमच्या घरात दिवाळी असो, दसरा असो किंवा नसो साधु संत येतच असतात. शिवसेनाप्रमुख, माँसाहेब असतानाही येत होते, आताही येतात. पण ते नीट बोलून सांगून येतात. पण दादागिरी करुन याल तर दादागिरी कशी मोडून काढायची हे शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याखेत समजावून सांगितलं आहे,” असा इशारा उद्धव ठाकरेंना यावेळी अप्रत्यक्षपणे राणा दांपत्याला दिला.



हेही वाचा

FIR रद्द करण्याची राणा दाम्पत्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली

मनसेचं ३ मेचं अल्टीमेटम कायम, राज ठाकरे निर्णयावर ठाम

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा