Advertisement

जितेंद्र आव्हाडांना अटक कधी ? किरीट सोमय्यांचा प्रश्न

ज्यांच्या सांगण्यावरून ही मारहाण झाली, त्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

जितेंद्र आव्हाडांना अटक कधी ? किरीट सोमय्यांचा प्रश्न
SHARES

ठाण्यातील अभियंत्याला मारहाण झाल्याप्रकरणी ३ पोलिसांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. परंतु ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर कधी कारवाई होणार? असा प्रश्न भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. (kirit somaiya demands to arrest jitendra awhad in thane engineer beaten up case)

ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून ठाण्यातील अभियंता अनंत करमुसे याचं अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आल्याच्या घटनेला ६ महिने पूर्ण झाले. याप्रकरणी नुकतीच ३ पोलिसांना तर एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. परंतु ज्यांच्या सांगण्यावरून ही मारहाण झाली, त्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

फेसबुकच्या माध्यमातून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या तरुणारा अभियंता अनंत करमुसे याला ५ एप्रिल २०२० रोजी ठाण्यात मारहाण झाली होती. काही पोलिसांनी करमुसेला पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याचं सांगत घरातून बाहेर बोलवलं आणि आव्‍हाड यांच्‍या विवियाना मॉल शेजारील बंगल्‍यावर नेलं. तिथं आव्हाड यांच्या उपस्थितीत २० ते २५ गुंडांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे याने केला होता. त्यानंतर करमुसे याच्या तक्रारीवरून वर्तक नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात देखील गेलं.

हेही वाचा - अभियंता मारहाण प्रकरण: जितेंद्र आव्हाडांना झटका, हायकोर्टाचे सीसीटीव्ही फुटेज घेण्याचे निर्देश

दरम्यान न्यायालयाच्या निर्देशानुसार याप्रकरणी ठाकरे सरकारने ६ महिन्यांनी ३ पोलिसांना अटक केली आहे. आतापर्यंत ९ लोकांना अटक झाली. पण जितेंद्र आव्हाड यांना कधी अटक होणार? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. करमुसेची भेट घेण्यासाठी जात असताना किरीट सोमय्या यांना मुलुंड इथं अटक करण्यात आली होती.

दरम्यान, ज्या तरुणाने माझ्या देखत, माझ्या माणसांनी त्याला मारहाण केल्याची तक्रार केली आहे. त्या तरूणाला मी ओळखत नाही. माझ्या विरोधात गेली ३ वर्षे हा अभियंता नाही नाही त्या पोस्ट करतोय, हे माझे कार्यकर्ते मला अनेकदा सांगायचे. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मी सतत २४ तास माझ्या मतदारसंघात आणि सोलापूर जिल्हयात कामात व्यस्त आहे. अभियंत्याला मारहाण केल्याचा प्रकार मला सोशल मीडियातून कळाला, असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.

हेही वाचा - आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणाचा तपशील द्या, न्यायालयाचे निर्देश


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा