Advertisement

अभियंता मारहाण प्रकरण: जितेंद्र आव्हाडांना झटका, हायकोर्टाचे सीसीटीव्ही फुटेज घेण्याचे निर्देश

ठाण्यातील अभियंत्याच्या मारहाणीचं प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात गेलं आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने बंगला आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन ते दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

अभियंता मारहाण प्रकरण: जितेंद्र आव्हाडांना झटका, हायकोर्टाचे सीसीटीव्ही फुटेज घेण्याचे निर्देश
SHARES

ठाण्यातील अभियंत्याच्या मारहाणीचं प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात गेलं आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने बंगला आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन ते दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. 

कुणाची याचिका?

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन झालेल्या मारहाण प्रकरणात आव्हाड यांना आरोपी करावं तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी याचिकाकर्ता आणि स्थापत्य अभियंता अनंत करमुसे याने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेतून केली आहे.   

यावर सुनावणी करताना न्या. गिरीश कुलकर्णी यांनी यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. शिवाय याप्रकरणी राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत उत्तर द्यावं असंही न्यायलयाने म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.

हेही वाचा - वाइन शाॅप, हाॅटेल्स सुरू करा, राज ठाकरेंचा सरकारला सल्ला

नेमकं प्रकरण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी दिवे प्रज्‍वलित करण्‍याचं आवाहन देशवासीयांना उद्देशून केलं होतं. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी यांच्या भूमिकेवर सोशल मीडियावरून टीका केली होती. त्यानंतर मोदी यांच्या आवाहनाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ठाण्यातील कासारवडवली  इथं राहणाऱ्या एका ४० वर्षीय इसमाने फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोस्ट लिहिली. दिवे लावणारे मूर्ख असतील तर आज अख्खा देश मूर्ख आहे का?, असा प्रश्न त्यांनी आव्हाड यांना विचारला होता. यासोबत जितेंद्र आव्हाड यांचं एक अश्लील चित्र देखील फेसबुकवर या तरूणाने पोस्ट केलं होतं. 

बेदम मारहाण

यानंतर करमुसे यांना रविवारी रात्री पोलिसांनी घरातून पोलिस ठाण्यात चल, असं सांगून घरातून बाहेर बोलवलं आणि आव्‍हाड यांच्‍या विवियाना मॉल शेजारील बंगल्‍यावर नेत आव्हाड यांच्या उपस्थितीत २० ते २५ गुंडांनी बेदम मारहाण केली असा आरोप करमुसे यांनी केला आहे. त्यानंतर करमुसे यांच्या तक्रारीवरून वर्तक नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

आव्हाडांचा खुलासा 

त्यावरही आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ज्या तरुणाने माझ्या देखत, माझ्या माणसांनी त्याला मारहाण केल्याची तक्रार केली आहे. त्या तरूणाला मी ओळखत नाही. माझ्या विरोधात गेली ३ वर्षे हा अभियंता नाही नाही त्या पोस्ट करतोय, हे माझे कार्यकर्ते मला अनेकदा सांगायचे. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मी सतत २४ तास माझ्या मतदारसंघात आणि सोलापूर जिल्हयात कामात व्यस्त आहे. अभियंत्याला मारहाण केल्याचा प्रकार मला सोशल मीडियातून कळाला, असं ते म्हणाले. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा