'त्या सात कंपन्यांशी शिवसेना नेत्यांचा सबंध काय?'

 Mumbai
'त्या सात कंपन्यांशी शिवसेना नेत्यांचा सबंध काय?'
Mumbai  -  

मुंबई - भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. किरीट सोमय्यांनी त्यांची संपत्ती वेबसाईटवर जाहीर केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपली संपत्ती जाहीर करावी, असं आव्हान सोमय्यांनी दिलं आहे. तसेच किरीट सोमय्या यांनी सात कंपन्यांची यादी जाहीर केली असून या कंपन्यांशी असलेले लागेबांधे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावेत, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे. सात कंपन्यांपैकी 2 कंपन्यांवर सेबीने बंदी घातली असून 2 कंपन्यांमध्ये छगन भुजबळांनी पैसे गुंतवल्याची माहिती सोमय्यांनी दिली. उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले नाही तर सर्व कागदपत्र माध्यमांना देणार असल्याचा इशाराही सोमय्यांनी दिलाय.

Loading Comments