Advertisement

किरीट सोमय्यांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोर्टानं दुसरा झटका दिला आहे.

किरीट सोमय्यांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
SHARES

भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोर्टानं दुसरा झटका दिला आहे. काल किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला. तर आज किरीट सोमय्या यांचा मुलागा नील सोमय्या (Neil Somaiya) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला आहे.

यएनएस विक्रांत प्रकरणात किरीट सोमय्या यांनी सेव्ह विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला आणि हा सर्व पैसा लाटला, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत करत आहेत.

मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री उशीरा भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली होती.

भोसले यांच्या तक्रारीनुसार, २०१३-१४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे ईशान्य मुंबईचे माजी खासदार किरीट सोमय्या, नील सोमय्या व इतरांनी पुढाकार घेऊन आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचविण्यासाठी नागरिकांकडून निधी जमा करण्याचे अभियान सुरू केले होते.

विक्रांत या युद्धनौकेनं १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यामुळे आयएनएस विक्रांतची डागडुजी होत आहे, हे समजल्यावर माजी सैनिक भोसले यांची त्यासाठी वर्गणी देण्याची इच्छा झाली.



हेही वाचा

राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेसाठी वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते टाळा

Silver Oak Attack: "गुप्तचर विभागानं कळवूनही पोलिसांनी हवा तेवढा बंदोबस्त ठेवला नाही"

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा