Advertisement

'मशाली'मुळेच शिवसेना पहिल्यांदा सत्तेत आली, चिन्हाने घडवलाय इतिहास

'धगधगत्या मशाली'सोबत शिवसेनेचे फार जुने नाते आहे.

'मशाली'मुळेच शिवसेना पहिल्यांदा सत्तेत आली, चिन्हाने घडवलाय इतिहास
SHARES

उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना ('उद्धव बाळासाहेब ठाकरे') हे नाव आणि मशाल हे चिन्ह मिळाले आहे. पण हे चिन्ह शिवसेनेसाठी काही नवीन नाही. धगधगत्या मशालीसोबत त्यांचे फार जुने नाते आहे. या धगधगत्या मशालीने अनेक इतिहास घडवले आहेत. जाणून घेऊयात शिवसेनेची मशालीसोबत जोडलेली नाळ...

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रभागी नेते म्हणून प्रबोधनकार ठाकरेंचे नाव घेतले झाले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या लोकांच्या आठवण म्हणून मुंबईच्या फोर्ट विभागातील फ्लोरा फाउंटन चौकात हाती मशाल घेतलेल्या क्रांतिवीर स्त्री-पुरुषांचा एक पुतळा उभारला गेला. हाती मशाल घेतलेल्या शेतकरी व कामगाराचा पुतळा या चौकात उभारण्यात आला. त्या पुतळ्याला हुतात्मा स्मारक म्हटले गेले. त्यामुळे फ्लोरा फाउंटन असलेल्या चौकाला हुतात्मा चौक असे नाव देण्यात आले. शिवसेनेचा जन्म मुळात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून झाला आहे.

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानतंर मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणारी संघटना स्थापन करण्याचा सल्ला प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना दिला. त्यानुसार 1966 च्या जून महिन्यात शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणसाच्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या संघटनेची अल्पावधीत लोकप्रियता वाढली. त्यामुळेच 1968 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं पहिल्याच फटक्यात 42 नगरसेवक निवडून आणले.

1985 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मशाला हे चिन्ह मिळाले होते. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ तेव्हा शिवसेनेत होते. तेव्हा शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडणून आले आणि पहिल्यांदा मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आली.

'धगधगती मशाल' या चिन्हावर शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची महापालिकेत सत्ता आली आणि मशालीने इतिहास घडविला.

बाळासाहेबांवर जिथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्या शिवाजी पार्कच्या एका भागामध्ये त्यांचे स्मृतीस्थळ आहे. त्याठिकाणी बाळासाहेबांच्या फोटोसमोरही एक मशाल कायम तेवत असते.हेही वाचा

ढाल-तलवार, इंजिन ते धनुष्यबाण, 'असा' आहे शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा प्रवास

पोलिसांकडून उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणारी 4500 प्रतिज्ञापत्रे जप्त

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा