Advertisement

पोलिसांकडून उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणारी 4500 प्रतिज्ञापत्रे जप्त

शिवसेनेचा बनावट शपथपत्र वाद चिघळला असून याविरोधात FIR नोंदवण्यात आली आहे. आता हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे,

पोलिसांकडून उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणारी 4500 प्रतिज्ञापत्रे जप्त
SHARES

उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत असल्याची अनेक शपथपत्र मुंबईत एकाच ठिकाणी आढळून आली होती. त्यानंतर शिंदे गटाकडून ही सर्व शपथपत्रे बनावट असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता हे प्रकरण आता गुन्हे शाखेकडे (क्राईम ब्रांच) वर्ग करण्यात आले आहे. सध्या राज्याच्या राजकारणात चालू असलेल्या घटनामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना नोटरीकडून प्रतिज्ञापत्र मिळाले, ज्यामध्ये शिवसेना समर्थकांचे आधार कार्ड सारखे महत्त्वाचे तपशील जोडले गेले. त्यानंतर निर्मल नगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) आणि ४६५ (बनावट) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की तक्रारदार वांद्रे येथील न्यायालयात गेले असता त्यांनी दोन व्यक्तींना प्रतिज्ञापत्रांसोबत पाहिले, ज्यावर नोटरीने शिक्का मारला होता. पोलिसांनी सर्व प्रतिज्ञापत्रे जप्त केली असून अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

निर्मल नगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रतिज्ञापत्र करणाऱ्या व्यक्तीला नोटरीसमोर हजर राहावे लागते. या प्रकरणात ज्यांची नावे प्रतिज्ञापत्रात होती ते लोक तेथे उपस्थित नव्हते. ते म्हणाले की पोलीस त्या लोकांना फोन करून खात्री करतील की त्यांच्याकडे ठाकरे गटाच्या समर्थनार्थ प्रतिज्ञापत्रे आहेत की नाही आणि त्यांच्या नावावर प्रतिज्ञापत्र तयार केले जात असल्याची त्यांना माहिती आहे का? या समर्थकांनी आपल्या वतीने प्रतिज्ञापत्र बनवण्याची जबाबदारी दुसऱ्या कोणावर टाकली आहे का? याचाही शोध पोलिस घेतील, असे ते म्हणाले.

दरम्यान, ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांची चौकशी करण्याची मागणी म्हस्के यांनी केली आहे.

स्टॅम्प पेपरचा वापर करुन ही शपथपत्र बनवण्यात आली होती. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी याबाबत एका व्हिडीओतून आरोपसुद्धा केला होता.

एकूण 4 हजार 682 बनावट शपथपत्र एकाच ठिकाणी आढळून आली असून याप्रकरणी गंभीर स्वरुपाची कायदेशी कारवाई केली जावी, अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली होती. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी याबाबत गंभीर आरोप उद्धव ठाकरे गटावर केला होता.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर संपूर्ण शिवसेना वेगळी झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शपथपत्रांची मोहीम राबवली. आम्ही निष्ठावंत, आम्ही उद्धव ठाकरेंसोबत, असा आशय असणारी शपथपत्र शिवसैनिकांकडून गोळा केली जात होती. दरम्यान, त्यातील 4 हजार पेक्षा जास्त शपथपत्रांबाबत आता शंका घेतली जात आहे.



हेही वाचा

ढाल-तलवार, इंजिन ते धनुष्यबाण, 'असा' आहे शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा प्रवास

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अयोध्येत येण्याचे निमंत्रण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा