Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अयोध्येत येण्याचे निमंत्रण

राज ठाकरे हे धर्माचे सैनिक असल्याचे सांगून महंतांनी त्यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अयोध्येत येण्याचे निमंत्रण
SHARES

अयोध्येतील हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदासजी महाराज व उदासीन अखाड्याचे महंत धर्मदास महाराज यांनी मनसे अध्यक्ष राठ ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना अयोध्या येण्याचे निमंत्रणही दिले. तसेच राज ठाकरे रे प्रभू श्रीरामाचे भक्त असून उत्तर प्रदेशच्या जनतेने त्यांना विरोध करू नये, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

दरम्यान, या भेटीनंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. “आम्ही आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आम्ही त्यांना आशीर्वाद देण्याबरोबरच अयोध्या येण्याचे निमंत्रणही दिले. यावेळी बोलताना त्यांनी गेल्या वेळी अयोध्या दौरा का रद्द केला, याची सविस्तर माहिती दिली. तसेच अयोध्येला नक्की येणार असे आश्वासनही त्यांनी दिले” असल्याचे ते म्हणाले.

“राज ठाकरे जर अयोध्येला येत असतील, तर आम्हाला आनंदच आहे. प्रभू राम हे सर्वांचेच आहे. राज ठाकरे हे प्रभू रामाचे सेवक आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या जनतेने त्यांना विरोध करू नये”, असेही ते म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी काही महिन्यांपूर्वी विरोध केला होता.

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण यांनी दिला होता. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत स्थानिक साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीत रॅलीही काढली होती.

बृजभूषण म्हणाले होते की, 'राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांवर केलेला अत्याचार आम्ही विसरणार नाही. साधूसंतांनी राज ठाकरेंना माफ केलं तरच राज यांनी अयोध्येत प्रवेश देण्याबद्दल विचार करू. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. साधूसंत आणि अयोध्यावासी राज ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी.'

ते पुढे म्हणाले की, आधी उत्तर भारतीयांवर अन्याय करायचा आणि नंतर अचानक राम भक्त बनायचं, हे जनतेच्याही लक्षात येत आहे. अयोध्येतील जनता राज ठाकरेंवर नाराज आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात अपशब्द वापरले होते, असं बृजभूषण यांनी म्हटलं होतं.

त्यामुळे महंतांचे निमंत्रण स्वीकारून राज ठाकरे अयोध्याला गेले तर बृजभूषण सिंह विरोध करतात कीत्यांचा विरोध थंडावला हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल. 



हेही वाचा

शिंदे गटाकडून पक्षासाठी तीन नावांचा पर्याय, 'ही' आहेत नावं

ढाल-तलवार, इंजिन ते धनुष्यबाण, 'असा' आहे शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा प्रवास

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा