Advertisement

एकनाथ गायकवाड यांना सर्वसामान्य जनतेची मिळेल का साथ?


एकनाथ गायकवाड यांना सर्वसामान्य जनतेची मिळेल का साथ?
SHARES

गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसचे बालेकिल्लेही भुईसपाट झाले. यात दक्षिण-मध्य मुंबई या पारंपरिक मतदारसंघाचा समावेश होता. २००९ च्या निवडणुकीत गायकवाड यांनीच शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत काँग्रेसला विजय मिळवून दिला होता. ५ वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. मोदी लाटही पूर्णपणे ओसरली आहे. आता पुन्हा २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे एकनाथ गायकवाड यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर शिवसेनेतर्फे खासदार राहुल शेवाळे हेच गायकवाड यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत.

मतदारसंघाचा आढावा
दोन-तीन निवडणुकांचा अपवाद वगळला तर, दक्षिण-मध्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा  गड राहिला आहे. त्याचं मुख्य कारण या मतदारसंघाची आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक रचना. जवळपास ६० ते ७० टक्के झोपडपट्ट्यांनी, मध्यमवर्गीय आणि कामगार वसाहतींनी व्यापलेला हा मतदारसंघ आहे. काही तुरळक उच्चभ्रू वस्ती आहे. या समीकरणानेच हा मतदारसंघ काँग्रेसच्या बाजूने राहिला. गेल्या वेळी शिवसेनेने बाजी मारली असली तरी यंदा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत. विद्यमान खासदार राहुल शेवाळे हेच पुन्हा शिवसेनेचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत. भाजपाबरोबर युती झाल्यामुळे शिवसेनेला त्याचा फायदा होईल. तरी २००४ व २००९ असे दोन वेळा विजयश्री खेचून लोकसभेत पोहोचलेले एकनाथ गायकवाड यांचाही या परिसरात चांगलाच दबदबा आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख
धारावी हा एकनाथ गायकवाड यांचा बालेकिल्ला समजला जातो. ते धारावीमधून ३ वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. तर २००४ मध्ये त्यांनी शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा पराभव केल्याने पक्षात त्यांचं स्थानही वाढलं. २००९ मध्ये काँग्रेस पक्षाने पुन्हा त्यांना संधी दिली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे सुरेश गंभीर यांचा ७५ हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर गायकवाड सोनिया गांधी यांच्या मर्जीतले नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यामुळेच मोदी लाटेत उद्ध्वस्त झालेला  गड पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. गायकवाडांनी आता पंच्याहत्तरी ओलांडली असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांना मतदारसंघात फिरताना मोठी दमछाक होत असल्याचं म्हटलं जात आहे.

वादग्रस्त विधान
या लोकसभा मतदारसंघातील ८० टक्के काँग्रेसजनांचा गायकवाड यांना विरोध आहे. त्यातच गायकवाड यांच्या सभेला काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी नागरिकांना संबोधताना. गायकवाड यांना अनुसरून नागरिकांमध्ये पैसे वाटा आणि मतदार विकत घेण्याची भाषा केली होती. त्यांच्या हा मध्ये हा मिळवत गायकवाड यांनीही पुढे ते म्हणणं मान्य केलं.


#MLviews

एकनाथ गायकवाड यांना त्यांच्याच पक्षाच्या अंतर्गत बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांना मनसेची साथ मिळत असली तरी ती त्यांना विजयाच्या किती जवळ नेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांच्यासमोर राहुल शेवाळेंसारख्या तरूण उमेदवाराचं तगडं आव्हान असल्यानं ते गायकवाड यांना किती पेलवेल हे पहावं लागेल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा