काँग्रेसचं मिशन पालिका व्हाया कोकण

  Pali Hill
  काँग्रेसचं मिशन पालिका व्हाया कोकण
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत कोकणी मते काँग्रेसकडे वळविण्याचा प्रयत्न होत असून, आता मुंबईतील अनेक कोकणी बहुल पट्यात काँगेसच्यावतीनं निर्धार सभा घेण्यात येणार आहे. यासाठी सिंधुदुर्गातील नगराध्यक्ष यांच्यासह इतर पदाधिकारी यांना या मेळाव्यांमध्ये निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. काँगेस पक्षाच्यावतीने 7 जानेवारी रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृह सभागृहात कोकणवासीयांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात काँगेस नेते नारायण राणे, काँग्रेस नेते गुरुदास कामत, मुंबई काँग्रेस नेते संजय निरुपम, काँग्रेस आमदार नितेश राणे आदी उपस्थित होते. या मेळाव्यात कोकणातील जनतेची मते काँगेस पक्षांकडे वळविण्याचा निर्धार करण्यात आला. विलेपार्ले येथे झालेल्या मेळाव्यानंतर आता कोकणी माणसांची लोकवस्ती असलेल्या कांदिवली चारकोपमध्ये येत्या चार- पाच दिवसांत कोकणातील जनतेचा मेळावा होणार आहे. यानंतर भांडुप, जोगेश्वरी, गिरगाव, आदी कोकणी बहुल वस्त्यांमध्ये असे मेळावे होणार आहेत.

  मुंबईतील 227 प्रभागांमधील 85 प्रभागांमध्ये कोकणी जनता हि मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. त्यामुळे आजवर हे मतदार शिवसेनेकडे होते. काही प्रमाणात ते मनसेकडे वळले होते. पण आता ही कोकणी मते काँगेस पक्षांकडे वळविण्याचा पूर्णपणे प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून होणार असल्याचे नितेश राणे यांनी स्पष्ट केले.⁠⁠⁠⁠

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.