शिवडीत हाऊसफुल्ल प्रचार

 Sewri
शिवडीत हाऊसफुल्ल प्रचार
शिवडीत हाऊसफुल्ल प्रचार
शिवडीत हाऊसफुल्ल प्रचार
शिवडीत हाऊसफुल्ल प्रचार
शिवडीत हाऊसफुल्ल प्रचार
See all
Sewri , Mumbai  -  

शिवडी - महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा रविवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे मुंबईतील रस्ते, गल्ली, नाके विविध पक्षांच्या प्रचार रॅलीने हाऊस फुल्ल झाले होते. शिवडी- वडाळा मतदार संघातील शिवडी नाका, शिवडी कोळीवाडा, ज्ञानेश्वर नगर, किडवाई नगर, जेरीबाई वाडिया रोड आदी ठिकाणी उमेदवारांमधून प्रचाराचा जोर दिसून येत होता. प्रत्येक वॉर्डमधले उमेदवार आणि कार्यकर्ते मोठया संख्येने घोषणाबाजी करत आमने-सामने प्रचार करत होते.

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने प्रत्येक पक्षाच्या रॅलीत नागरिकांची प्रचारासाठी मोठी गर्दी दिसत होती. तसेच घरोघरी जाऊन मतदान करा, असे आवाहनही करण्यात येत होते. तर मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी अनेक उमेदवारांनी आपल्या प्रचार रॅलीदरम्यान फटाके वाजवले. प्रचारासाठी उमेदवारांबरोबर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना गरमागरम वडापाव आणि कोल्ड्रिंक्सचे ट्रे जात होते. त्याचबरोबर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात व्हेज पुलाव, व्हेज बिर्याणी, चिकन - मटण बिर्याणीचा बेत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगत होती.

Loading Comments