Advertisement

नरेंद्र पाटील कृष्णकुंजवर, घेतली राज ठाकरेंची भेट


नरेंद्र पाटील कृष्णकुंजवर, घेतली राज ठाकरेंची भेट
SHARES

मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केलेले धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवारी कुष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. मात्र या भेटी दरम्यान राज आणि नरेंद्र पाटील यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? यासंदर्भात गुप्तता पाळण्यात आली आहे.


अजून मोबादला नाही

राज ठाकरे आणि नरेंद्र पटील यांच्या भेटीनंतर त्या दोघांमधील चर्चेबद्दल गुप्तता पाळण्यात आली असली, तरी सरकारकडून मिळणाऱ्या मोबदल्यासंदर्भात त्यांना विचारलं असता सरकारकडून निराशा झाल्याचं त्यांनी म्हटलं. सरकारकडून जमीन मोबादल्यासंदर्भात अजून कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचं पाटील यांनी सांगितलं.


काय आहे प्रकरण?

राज्य सरकारने औष्णिक वीज प्रकल्पासाठी शिंदखेडा येथील शेतजमिनीचं भूसंपादन सुरु केलं. त्यात धर्मा पाटील यांची ५ एकर जमीन देखील संपादित झाली. धर्मा पाटील यांच्या शेतात ६०० आंब्याची झाडे होती. बोअरवेल, विहिर देखील होती. प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनीच्या चार पट मोबदला देण्याचं सरकारी धोरण असताना पाटील यांना फक्त ४ लाख ३ हजार रुपये इतकाच मोबदला मिळाला. तर लगतच्या शेतमालकांना जवळपास दीड कोटी रुपयांचा मोबदला मिळाला, असा पाटील कुटुंबीयांचा आरोप आहे.


फक्त घोषणा, कार्यवाही नाही

मंत्र्यालयात वारंवार चकरा मारूनही दाद न मिळाल्याने त्यांनी कंटाळून मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांचं रुग्णालयात निधन झालं. याप्रश्नी देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्या जमिनीचं पुनर्मुल्यांकन करून नव्याने मोबदला देण्याची घोषणा केली. मात्र अद्याप त्या संदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असं नरेंद्र पाटील यांचं म्हणणं आहे.



हेही वाचा-

धर्मा पाटील मृत्यू प्रकरण: ३० दिवसांच्या आत व्याजासहित देणार मोबदला- बावनकुळे

धर्मा पाटील मृत्यूप्रकरणी सेना-भाजपमध्ये रंगला कलगीतुरा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा