उमेदवारी अर्ज भरण्याची धावपळ

  Mumbai
  उमेदवारी अर्ज भरण्याची धावपळ
  मुंबई  -  

  मुंबई - उमेदवारी अर्ज भरायला फक्त दोन दिवस उरल्याने काही जणांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरले. बंडखोरी होवू नये म्हणून राजकीय पक्षांनी बुधवारी रात्री उशिरा उमेदवारांना एबी फॉर्म वाटले. त्यामुळे नावे जाहीर झालेल्या उमेदवारांकडे फक्त गुरुवार आणि शुक्रवार हे दोनच दिवस अर्ज भरण्यासाठी उरलेत. मुंबईतील दादर, परेल, मस्जिद बंदर तसेच सँडहर्स्टरोड परिसरातील उमेदवारांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरलेत. प्रभाग क्रमांक 195 मध्ये भारिपच्या जितेंद्र दोडके, वॉर्ड क्रमांक 224मधून भाजपाच्या सरला गवादे, प्रभाग क्रमांक 183 मधून शिवसेनेच्या उर्मिला कटके, प्रभाग क्रमांक 184 मधून शिवसेनेच्या राजेंद्र सूर्यवंशी, प्रभाग क्रमांक 186 च्या वसंत नकाशे आणि 187 मधून शिवसेनेच्या मारियालम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.