Advertisement

'चार साल, बुरे हाल' म्हणत डाव्यांचं आंदोलन


'चार साल, बुरे हाल' म्हणत डाव्यांचं आंदोलन
SHARES

चार वर्षांत दिलेल्या आश्‍वासांना पूर्ण करण्यात अयशस्वी ठरलेल्या मोदी सरकारच्या कारभाराविरुद्ध मुंबईत जनएकता जनअधिकारी संघटनेअंतर्गत आंदोलन करण्यात आलं. मुंबईत दादरमधील कोतवाल गार्डन ते दादर पूर्वे दरम्यान बुधवारी सायंकाळी हे आंदोलन काढण्यात आलं. या आंदोलनात मुंबईतील पुरोगामी संघटनांसह ५०० आंदोलक सहभागी झाले होते.

भारतातील एकूण १०४ संघटनांच्या वतीने देशभर १७ मे ते २३ मे दरम्यान मोदी सरकारविरोधात 'पोल खोल, हल्ला बोल, चार साल बुरा हाल' आंदोलन काढण्यात आलं. या आंदोलनाचे पडसाद बुधवारी मुंबईतही उमटले.


आंदोलनाचं कारण काय?

चार वर्षांपूर्वी मोदी सरकारने सत्तेवर येऊन भारतातील जनतेला असंख्य आश्वासने दिली होती. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी २ कोटी रोजगार उपलब्ध करणार, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करणार, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करणार, राज्य भ्रष्टाचारमुक्त करणार, स्वीस बँकेतील काळा पैसा देशात परत आणणार आणि देशातील जनतेसाठी 'अच्छे दिन' आणणार अशी अनेक आश्‍वासने देण्यात आली. मात्र, ४ वर्षांत तसं काहीही न झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं.



हेही वाचा-

मुंबईतले आमदार दहशतवाद्यांच्या हल्ल्यात थोडक्यात बचावले


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा