Advertisement

अखेर संतोष खरात यांचा पत्ता कापला, सुवर्णा कारंजे यांना विधी समिती


अखेर संतोष खरात यांचा पत्ता कापला, सुवर्णा कारंजे यांना विधी समिती
SHARES

महापालिकेच्या विधी समिती अध्यक्षपदासाठी अॅड संतोष खरात यांचं नाव पक्षाने जाहीर केल्यानंतर स्थानिक पातळीवर याला जोरदार विरोध झाल्याने त्यांचा पत्ता कापला गेला. त्यांच्या ऐवजी भांडुपच्या नगरसेविका सुवर्णा कारंजे यांना उमेदवारी जाहीर झाली. शिवसेनेने खरात यांचं नाव आपल्या मुखपत्रात जाहीर केलं होतं. परंतु, जाहीर केलेलं नाव स्थानिक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमुळे बाद करण्याची नामुष्की सेनेवर ओढवली. त्यामुळे सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी याचा फायदा उठवून विधी समिती अध्यक्षपदाचे वाण जिवलग मैत्रीण असलेल्या सुवर्णा कारंजे यांच्या पदरात टाकले.


यांचे अर्ज सादर

मुंबई महापालिकेच्या विधी व महसूल, महिला व बालकल्याण आणि बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या मंगळवारी १७ एप्रिलला पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यात आले. यामध्ये विधी समिती अध्यक्षपदासाठी सुवर्णा कारंजे यांनी तर उपाध्यक्षपदासाठी चंद्रावती मोरे यांनी उमेदवारी अर्ज उपचिटणीस विजयप्रदा बोरकर यांच्याकडे सादर केले.


यांच्याकडे अर्ज सादर

महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदासाठी स्मिता गावकर यांनी तर उपाध्यक्षपदी उर्मिला पांचाळ यांनी उमेदवारी अर्ज भरले. तर बाजार व उद्यान समिती अध्यक्षपदासाठी हाजी मोहमद हलीम खान व उपाध्यक्षपदासाठी उमेश माने यांनी उमेदवारी अर्ज उपचिटणीस विजयप्रदा बोरकर यांच्याकडे सादर केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा