अमित ठाकरेंची फेसबुकवर एंट्री

 Mumbai
अमित ठाकरेंची फेसबुकवर एंट्री

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी फेसबुकवर एंट्री केली आहे. वडिलांचं व्यंगचित्र पोस्ट करत अमितने फेसबुकवर पाऊल ठेवलं आहे. ज्यांच्याकडून शिकलो, त्यांच्याचकडून सुरुवात, असं या व्यंगचित्राला कॅप्शनही दिले आहे. 

अमित ठाकरे यांनी अधिकृत फेसबुक पेज का सुरू केले याबाबत भूमिकाही मांडली आहे.​

"माझे स्वतःचे अधिकृत पेज सुरू करण्यामागची भूमिका खर तर खूपच साधी आहे. इतक्या लोकांशी संवाद सादायला फेसबुक पेजचा पर्याय वापरतोय," अशी भूमिका फेसबुकद्वारे मांडलीय.

 

Loading Comments