क्रिकेटचा सामना राजकारणात!

मुंबई - क्रिकेटमधील शब्द सध्या राजकारणात ऐकायला मिळाले तर नवल वाटून घेऊ नका...कारण सध्या पालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेमध्ये सामना रंगलाय..आणि त्यामुळेच सध्या हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करताना दिसतायेत. भाजापाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप केला होता. त्याला शिवसेना आमदार अनिल परब यांनी क्रिकेटच्या भाषेत उत्तर दिलंय. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी तर मुलुंड डंपिंगच्या मुद्द्यावर किरीट सोमय्या ब्लॅक मेलर असल्याचा घणाघात केलाय. दरम्यान, शिवसेना-काँग्रेस एकच भाषा बोलत असल्याचा आरोप माधव भांडारी यांनी केलाय.

Loading Comments