Advertisement

लोकसभेसाठी 'हे' असतील शिवसेनेचे स्टार प्रचारक

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. प्रचाराची सर्वाधिक जबाबदारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर असणार आहे.

लोकसभेसाठी 'हे' असतील शिवसेनेचे स्टार प्रचारक
SHARES

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पाठोपाठ आता शिवसेनेनेही आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाही केली आहे. यामध्ये सुभाष देसाई, विनोद घोसाळकर, संजय राऊत यांसारख्या दिग्गजांची नावं आहेत. येत्या काही दिवसांत हे नेते निरनिराळ्या मतदारसंघात जाऊन पक्षाचा आणि उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.


मनोहर जोशींना वगळलं

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. तसंच जालन्याच्या जागेसाठी इच्छुक असणारेा पशू व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याही नावाचा या लिस्टमध्ये समावेश करण्यात आला नाही. तर दुसरीकडे प्रचाराची सर्वाधिक जबाबदारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर असणार आहे.


कोण आहेत प्रचारक ?

स्टार प्रचारकांच्या यादीत केंद्रीय मंत्री अनंत गीते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंधारण राज्य मंत्री विजय शिवतारे, सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील , खासदार संजय राऊत, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार नीलम गोर्हे, माजी आमदार आणि म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, शिवसेना नेते आदेश बांदेकर आणि नितीन बाणगुडे पाटील यांचा समावेश आहे.हेही वाचा - 

शिवसेनेकडून पुन्हा किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध

काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकरला मिळणार उत्तर मुंबईतील उमेदवारी?
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा