'सरकारने नोंद घ्यावी यासाठी मराठा समाजाचा चक्का जाम'

दादर - कुठलाही अनुचित प्रकार न होता मुंबईच्या पाच ते सहा ठिकाणी मंगळवारी चक्का जाम आंदोलन करण्यात आले, असं सांगत सरकारने नोंद घ्यावी यासाठी हा चक्का जाम असल्याची प्रतिक्रिया मराठा मोर्चा समितीचे सदस्य ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली. मुंबईत आचारसंहिता असताना मराठा समाजाने हा शांततेत चक्का जाम केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. मराठा आरक्षणाचा तिढा आघाडी आणि युतीचंही सरकार सोडवण्यात अयशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. तसेच मराठा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या राजकारण्यांनी स्वत:च्या फायद्याचाच विचार केला, मराठा समाजाचा नाही असा टोला त्यांनी मराठा नेत्यांना ‘मुंबई लाइव्ह’च्या 'उंगली उठाओ' या कार्यक्रमात लगावला. तसंच मंडल आयोगाच्या काळात आरक्षण मिळावं म्हणून मराठा नेत्यांनी का प्रयत्न केले नाहीत? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Loading Comments