शिवसेनेला मनसेचं जाहीर आव्हान

 Lower Parel
शिवसेनेला मनसेचं जाहीर आव्हान
शिवसेनेला मनसेचं जाहीर आव्हान
शिवसेनेला मनसेचं जाहीर आव्हान
शिवसेनेला मनसेचं जाहीर आव्हान
शिवसेनेला मनसेचं जाहीर आव्हान
See all
Lower Parel, Mumbai  -  

लोअर परळ - प्रभाग क्रमांक 195 मध्ये येणाऱ्या निवडणुकीची धुमचक्री जोरात सुरूये. चक्क मनसेचे शाखा अध्यक्ष मारुती दळवी यांनी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांना जाहीर आव्हान दिलंय. "शिवसेना आमदार सुनील शिंदे 2012 साली नगरसेवक असताना ना. म. जोशी मार्ग पालिका शाळा दुरुस्त करून घेतली होती, त्याचा खर्च 6.5 कोटी दाखवला होता, आज परत एकदा ना. म. जोशी शाळा दुरुस्तीसाठी महापौर स्नेहल आंबेकर यांनी काढली आहे, विकास कुठे आणि कसा करावा हे न कळल्यामुळे सर्व गरिबांचा पैसा चुकीच्या ठिकाणी खर्च होत आहे". असा आरोप मनसे शाखा अध्यक्ष दळवी यांनी केलाय. तर सुनील शिंदे लोकप्रतिनिधी या नात्याने, या विषयावर योग्य ते स्पष्टीकरण देण्याची मागणीही दळवी यांनी केली. तर शाळेच्या दुरुस्ती करण्यामागे एवढा खर्च झालाय का? याची सध्या चर्चा लोअर परळमधील नागरिकांमध्ये आहे.

Loading Comments