Advertisement

Coronavirus update: महाराष्ट्रावर Lock Down ची वेळ आलीय?


Coronavirus update: महाराष्ट्रावर Lock Down ची वेळ आलीय?
SHARES

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून राज्य सरकारकडून दररोज वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. खासकरून गर्दी टाळण्यासाठी शाॅळा-काॅलेजांना सुट्टी देण्यापासून ते माॅल-हाॅटेलांमध्ये नाहक गर्दी करू नये, असं आवाहनही राज्य सरकारकडून नागरिकांना करण्यात येत आहे. असं असूनही कोरोना पसरत असून गर्दी कमी होण्याचं नाव घेत नसल्याने सरकारकडून Lock Down चा निर्णय घेण्यात येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

कोरोनाची लागण झालेल्या महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या मागील काही दिवसांमध्ये झपाट्याने वाढली आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या ३८ रुग्णांवर उपचार सुरू असून मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात (kasturba hospital) एका ६५ वर्षांच्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाने घेतलेला हा मुंबईतील (coronavirus death in mumbai) पहिला बळी आहे. मृत व्यक्तीची पत्नी आणि मुलालाही कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे.

हेही वाचा - Corona Virus :...तर कोरोनाग्रस्त रुग्णांना स्थानबद्ध करणार- राजेश टोपे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा-काॅलेज (school and colleges close) बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्याचसोबत १०-१२ वी च्या परीक्षा वगळता इतर सर्व परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश देण्याच्या सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

मुंबईत जमावबंदीचं कलम १४४ लागू (section 144) करण्यात आलं असून पुण्यातही संचारबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. नाट्यगृह, सिनेमागृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा, सभा, संमेलने बंद ठेवण्याचे आदेश देतानाच माॅल-हाॅटेलमध्ये जाऊन कुणी नाहक गर्दी करू नये असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. गर्दी टाळण्यासाठी मंत्रालयात विविध कामांसाठी येणाऱ्या अभ्यागतांना प्रवेश बंदी करण्यात आली असून दर २० मिनिटांनी मंत्रालयात स्वच्छता केली जात आहे. 

सोबतच खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्राॅम होमची (work from home) मुभा द्यावी, अशी सूचना राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. शिवाय राज्यातील सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा विचारही सरकारकडून सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात Lock Down करण्यात येईल का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारला होता. त्यावर सध्या तरी Lock Down ची वेळ आली नसल्याचं त्यांनी सांगितलं. 

मुंबईच्या सार्वजनिक व्यवस्थेचा कणा असलेली लोकल ट्रेन, बेस्ट बस आणि मेट्रोतून आजही मोठ्या संख्येने प्रवासी गर्दीतून प्रवास करत आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना गर्दीतील हा प्रवास देखील धोक्याचा ठरू शकतो. त्यामुळे सरकारने Lock Down केलं पाहिजे, असंही म्हटलं जात आहे. Lock Down म्हणजे १०० टक्के व्यवहार बंद, सरकारी, खासगी कार्यालयांसोबतच सरकारला लोकल ट्रेन, बस, टॅक्सी-रिक्षा इ. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. तसं झालं तर मुंबईकरांनाही आपल्या घरांत थांबवण्यावाचून पर्याय नसेल.   

हेही वाचा - Corona Virus: नवी मुंबई महापालिकेची निवडणूक ६ महिने पुढं ढकला - जितेंद्र आव्हाड



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा