Advertisement

Corona Virus: नवी मुंबई महापालिकेची निवडणूक ६ महिने पुढं ढकला - जितेंद्र आव्हाड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड (state housing minister jitendra awhad) यांनी येऊ घातलेली नवी मुंबई महापालिनगरपालिका निवडणूक (nmmc election 2020) पुढं ढकलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Corona Virus: नवी मुंबई महापालिकेची निवडणूक ६ महिने पुढं ढकला - जितेंद्र आव्हाड
SHARES

कोरोनाचा कहर (coronavirus) वाढतच चालल्याने राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (state housing minister jitendra awhad) यांनी येऊ घातलेली नवी मुंबई महापालिनगरपालिका निवडणूक (nmmc election 2020) पुढं ढकलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

हेही वाचा- Corona Virus : मुंबईत जमावबंदीचा आदेश लागू

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (state housing minister jitendra awhad) यांनी निवडणूक आयोगाला (election commission) रितसर पत्र लिहून नवी मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रात ते म्हणतात, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेचं हित लक्षात घेऊन काही शहरांमधील सार्वजनिक गर्दीची ठिकाणे तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

नजीकच्या काळात नवी मुंबई महापालिका (nmmc election 2020) निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकं एकमेकांच्या संपर्कात येतील. त्यामुळे या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची निवडणूक ६ महिने पुढे ढकण्यात यावी, अशी मागणी आव्हाड यांनी निवडणूक आयोगाला (election commission) केली आहे. 

नवी मुंबई महापालिका निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी फेब्रुवारी २०२० मध्ये आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. महापालिकेत १११ प्रभाग असून ५६ महिला व ५५  पुरुष लोकप्रतिनिधी असणार आहेत. आरक्षित प्रभागांमध्ये अनुसूचित जातीसाठी १०, अनुसूचित जमातींसाठी २, नागरिकांची मागास प्रवर्गासाठी ३० तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी  ६९ प्रभाग अशी स्थिती आहे.

हेही वाचा- Coronavirus Update: राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३३ वर

याचसोबत औरंगाबाद महापालिकेची निवडणूक (aurangabad municipal corporation election 2020) देखील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ६ महिने पुढे ढकलण्याची मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि महापौर नंदकुमार घोडले यांनी केली आहे. निवडणूक पुढे ढकलताना महापालिकेवर प्रशासक नेमू नये. विद्यमान नगरसेवकांनाच ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी घोडले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना पत्र लिहून केली आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा