पदाधिकाऱ्यांना शिवसेना नेत्यांकडून तंबी

 Mumbai
पदाधिकाऱ्यांना शिवसेना नेत्यांकडून तंबी
पदाधिकाऱ्यांना शिवसेना नेत्यांकडून तंबी
See all
Mumbai  -  

वडाळा - शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना तंबी दिल्यानंतर वडाळा प्रभाग 178 ची शाखा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

युवा सेना कोषाध्यक्ष अमेय घोले यांना उमेदवारी जाहीर झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी पसरली होती. त्यामुळे गुरुवारी वडाळा पश्चिम येथील भास्कर वाडीतल्या प्रभाग 178 च्या शाखेला टाळे ठोकत या उमेदवारांविरोधात जाहीर निषेध करण्यात आला होता. मात्र या सर्व प्रकरणात शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी मांडवली करत शिवसेना शाखेला लागलेले टाळे उघडले. शाखा कोणाची खासगी प्रॉपर्टी नसून ती सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी आहे. अशी तंबी दिल्यानंतर शुक्रवारी वडाळा प्रभाग 178 ची शाखा पुन्हा खुली करण्यात आली आहे.

Loading Comments