Advertisement

मतदान केंद्रांवर जाणून-बूजून दिरंगाई केल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय निवडणूक आयोगा (ECI)वर टीका केली आहे.

मतदान केंद्रांवर जाणून-बूजून दिरंगाई केल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
SHARES

मुंबईतील अनेक मतदारसंघात संथ गतीने मतदान सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. अनेक मतदान केंद्रावरील मतदारांनी मतदानासाठी दोन-तीन तास वाट पाहत असल्याची तक्रार केली. शहरातील अनेक बूथवर मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर काही जण उष्णतेमुळे मतदान न करताच निघून गेले.

मतदानाला उशीर झाल्याबद्दल शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय निवडणूक आयोगा (EC)वर टीका केली आहे. हे जाणूनबुजून केले गेले की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. “एक गलिच्छ खेळ खेळला जात आहे असे दिसते. EC भाजपची सेवा करत आहे का? मतदानाचा वेग कमी करण्याचा मुद्दाम प्रयत्न केला जात आहे, असा आरोप ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मतदारांमध्ये उत्साह खूप आहे. मतदार हे मतदानासाठी उतरले आहेत. मात्र, निवडणूक आगोय पक्षपातीपणा करत असल्याचे दिसत आहे. मतदान केंद्रांवर खूप दिरंगाई केली जात आहे. जाणून बुजून दोनदा तिनदा नावे तपासली जात आहेत. यामुळे मतदान केंद्रावर पोहचूनही अनेक वेळ ताटकळत थांबावे लागत असल्याने ज्येष्ठ नागरिक तसेच महिला मतदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांकडून मुद्दामहून वेळ काढला जात आहे. दिरंगाई केली जात आहे. 

उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर पलटवार केला. “आम्हीच पहिल्यांदा ECI कडे मतदानाच्या संथ गतीबद्दल तक्रार केली होती. आता नेहमीप्रमाणे ठाकरे यांनी खरडपट्टी काढण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक हरणार हे लक्षात आल्यानंतर पंतप्रधान मोदींवर आरोप करण्याची त्यांना सवय आहे, असे फडणवीस म्हणाले.

ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेवर आक्षेप घेत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लोकप्रतिनिधी कायदा 1951 आणि भारतीय दंड संहितेचे उल्लंघन करत असल्याची तक्रार ECI कडे केली. संपूर्ण मुंबईत मतदान होत असल्याने ठाकरे यांची पत्रकार परिषद आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारी होती. ठाकरे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.हेही वाचा

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024: 13 जागांवर अंदाजे 49.15% मतदान

उत्तर मध्य मुंबईत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सर्वाधिक उमेदवारः सर्वेक्षण

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा