Advertisement

शेतकऱ्यांसाठी 'स्वतंत्र अर्थसंकल्प', काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'जन आवाज' जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘हम निभाएंगे’ असं जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर आश्वासन देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी 'स्वतंत्र अर्थसंकल्प', काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध
SHARES

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'जन आवाज' जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘हम निभाएंगे’ असं जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर आश्वासन देण्यात आले आहे. नवी दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयात काँग्रेसनं मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित करून हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, पी. चिदंबरम आणि सुरजेवाला उपस्थित होते.


'राफेल डील'ची चौकशी

जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी काँग्रेसचे जाहीरनामा समितीचे सदस्‍य भालचंद्र मुणगेकर यांनी काँग्रेस सत्‍तेत आल्यास राफेल लढाऊ विमानाच्या व्यवहाराची चौकशी करण्यात येईल असं सांगितलं तसंच हे आश्वासन जाहीरनाम्यान दिल्याचंही ते म्हणाले.


शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प

काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात शेतकरी आणि रोजगारावर लक्ष दिलं आहे. काँग्रेसनं ३ राज्यांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. तसंच, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली तर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार असल्याचं स्पष्ट केलं.


१५० दिवसांचा रोजगार

या जाहीरनाम्यात राहुल गांधी यांनी काँग्रेस मनरेगा योजनेअर्तंगत १०० दिवसांऐवजी १५० दिवसांचा रोजगार देणार असं नमूद करण्यात आलं आहे.


दरवर्षाला ७२ हजार रुपये

उत्पन्न, रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि शेतकरी हे काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे केंद्रबिंदू आहेत. त्याशिवाय, काँग्रेसचं सरकार आल्यावर बेरोजगार गरीबांच्या खात्यात दर वर्षाला ७२ हजार रुपये जमा करेल. त्यामुळं २५ कोटी जनतेला त्याचा फायदा होईल, असं राहुल गांधी यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करताना सांगितलं.


२२ लाख सरकारी नोकऱ्या

जाहीरनामा प्रसिद्ध करताना राहुल गांधी यांनी सत्ता आल्यास ६ महिन्यांमध्ये २२ लाख नोकऱ्या निर्माण करणार असं अश्वासन दिलं.


फौजदारी गुन्हा नसेल

शेतकऱ्याना कर्ज फेडता न आल्यास तो फौजदारी गुन्हा नसेल, तर तो केवळ दिवाणी स्वरुपाचा असेल असंही राहुल यांनी म्हटलं.



हेही वाचा -

‘काँग्रेसमुक्त भारत’ भूमिकेला विरोध– उद्धव ठाकरे

न्या. प्रदीप नांदराजोग मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा