Advertisement

‘काँग्रेसमुक्त भारत’ भूमिकेला विरोध– उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खा. संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. तसंच यावेळी त्यांनी काँग्रेसमुक्त भारतसारख्या भाजपाच्या काही भूमिकांना आपला विरोध असल्याचंही स्पष्टपणे सांगितलं.

‘काँग्रेसमुक्त भारत’ भूमिकेला विरोध– उद्धव ठाकरे
SHARES

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खा. संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. तसंच यावेळी त्यांनी काँग्रेसमुक्त भारतसारख्या भाजपाच्या काही भूमिकांना आपला विरोध असल्याचंही स्पष्टपणे सांगितलं.

काँग्रेसमुक्त भारतला विरोध

मुलाखतीदरम्यान, संजय राऊत यांनी काँग्रेसमुक्त भारतानं देशातील सर्व प्रश्न मार्गी लागतील का? असा सवाल उद्धव ठाकरे यांना केला. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमुक्त भारतला आपला विरोध असल्याचं सांगितलं. तसंच आपली अशी कधीही भूमिका नव्हती. विरोधी पक्ष हा असायलाच हवा, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या काही आठवणींनाही उजाळा दिला. मुख्यमंत्र्यांवर जबाबदारी ही असतेच; परंतु विरोधी पक्षातील नेत्यांवर त्यापेक्षा मोठी जबाबदारी असते, असं बाळासाहेब सांगत असत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. विरोधी पक्ष नेत्यांवरही जनतेला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असल्याचंही त्यांनी सांगितल्याचं उद्धव म्हणाले.

काँग्रेसची अवस्था निर्णायकी

आज देशात काँग्रेसची अवस्था ही निर्णायकी आहे. आपण कधीही काँग्रेसमुक्त देश किंवा काँग्रेसला नष्ट करा, असं म्हटलं नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. काँग्रेसकडे सद्यस्थितीत नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्यासारखी दिग्गज नेतेमंडळी नसल्याचं सांगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यांचीही उद्धव यांनी स्तुती केली.

हेही वाचा -

महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा दावा

युवासेनेची नाराजी दूर? पूनम महाजन यांनी घेतली आदित्य, उद्धव ठाकरेंची भेट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा