निरूपम यांच्यासमोर किर्तीकरांचं पारडं जड?


निरूपम यांच्यासमोर किर्तीकरांचं पारडं जड?
SHARES

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तीकर आणि काँग्रेसचे संजय निरूपम यांच्या मुख्य लढत आहे. मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी करण्याचा आरोप लावण्यात आल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निरूपम यांचं अध्यक्षपद गेलं. पण सोबत काँग्रेसने दिवंगत नेेते गुरूदास कामत यांच्या जागेवर निरूपम यांना तिकीट दिलं. 


तर, दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे गजानन किर्तीकर २०१४ मध्ये मोदी लाटेत जिंकून आल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर दुसऱ्यांदा विश्वास टाकला आहे. किर्तीकर यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. तर निरूपम यांच्यासाठी हार्दीक पटेलपासून शत्रुघ्न सिंहा सभा घेताना दिसले.  

निरूपम उत्तर भारतीयांमध्ये लोकप्रिय असले, तरी किर्तीकर यांची देखील परप्रांतीयांमध्ये चांगलीच पकड आहे. मनसेने निरूपम यांना पाठिंबा न देणं किर्तीकर यांच्यावर पथ्यावर पडू शकतं. कारण या मतदारसंघात प्रामुख्याने मराठी आणि परप्रांतीय मतदारांचा भरणा आहे.    

किर्तीकर खासदार असूनही क्वचितच आपल्या मतदारसंघात फिरकले. त्यातुलनेत निरूपम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहील. प्रसिद्धीच्या बाबत निरूपम यांनी किर्तीकरांना बरंच मागे सोडलं, असलं तरी मतं मिळवण्याच्या बाबतीत कोण कोणाला पिछाडीवर टाकणार हे आताच सांगणं कठीण आहे.  


या मतदारसंघात ५४.२६ टक्के मतदान झालं आहे. 

  • यापैकी जोगेश्वरी पूर्वेकडील २,७९,६१७ मतदारांपैकी १,६८,७७० मतदारांनी सर्वाधिक ६०.३६ % मतदान केलं.
  • त्यापाठोपाठ अंधेरी पूर्वेकडील २,७१,२२० मतदारांपैकी १,५५,४४३ मतदारांनी (५७.३१%) मतदान केलं.
  • दिंडोशीतील २,७८,७४१ मतदारांपैकी १,५९,०५६ मतदरांनी (५७.०६%) मतदान केलं.
  • अंधेरी पश्चिमेकडील ३,०१,२२९ मतदारांपैकी १,५१,१०९ मतदारांनी (५०.१६%) मतदान केलं.
  • तर वर्सोव्यातील २,७७,४९० मतदारांपैकी १,३४,६५३ मतदारांनी सर्वात कमी (४८.५३%) मतदान केलं.


संबंधित विषय