Advertisement

मनसे नगरसेवक शिवसेनेत दाखल


मनसे नगरसेवक शिवसेनेत दाखल
SHARES

मालाड - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालाड पश्चिमेकडील मनसेचे एकमेव नगरसेवक दीपक पवार यांनी मनसेला रामराम ठोकत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
मालाडमधील मनसेचे एकमेव नगरसेवक दीपक पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे मनसेला धक्का बसला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे केलेल्या कामांची दखल घेत नसल्यामुळे पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा