मनसेची शिवाजी पार्कमध्ये गुढी

  Dadar (w)
  मनसेची शिवाजी पार्कमध्ये गुढी
  मुंबई  -  

  शिवाजी पार्क - सालाबादाप्रमाणे यंदाही मनसेच्या वतीने दादरमध्ये शिवाजी पार्क येथे गुढी उभारण्यात आली. दरवर्षी गुढीपाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाचा मेळावा घेत असतात. परंतु यंदा निवडणूकीत आलेल्या अपयशामुळे यावर्षीचा मेळावा रद्द करण्यात आला आहे. असे असले तरीही प्रत्येक विभागातील मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शिवाजी पार्क उद्यान गणेश मंदिराजवळ गुढीपाडव्या निमित्त 15 फुटांची गुढी उभारली.

  यावेळी दादर माहीम मधील महत्वाचे कार्यकर्ते यांच्यासह विनोद खोपकर, यशवंत किल्लेदार, मनसे नेते नितीन सरदेसाई, माजी नगरसेवक संदीप देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

  निवडणूकीत आलेल्या अपयशामुळे दरवर्षी घेण्यात येणारा मनसे मेळावा यंदा रद्द करण्यात आल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांची विषेश गर्दी यावेळी पहायला मिळाली नाही. सकाळच्या प्रहरात गुढी उभारल्या नंतर काही वेळातचं कार्यकर्ते शिवाजी पार्कातून निघून गेल्याचे चित्र पहायला मिळाले. त्याचबरोबर मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित नसल्यामुळे विषेश उत्साह पहायला मिळाला नाही.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.