'मराठी माणसाला शिवसेनेनेच बेरोजगार केले'

 Dadar
'मराठी माणसाला शिवसेनेनेच बेरोजगार केले'
Dadar , Mumbai  -  

दादर - भारतीय कामगार सेना, माथाडी कामगार सेना या कामगार संघटनांच्या माध्यमातून मराठी माणसाला बेरोजगार करण्याचे काम आणि मुंबई बाहेर काढण्याचे काम शिवसेनेने केल्याचा आरोप भाजपा प्रवक्ता माधव भांडारी यांनी केला आहे.

मराठी माणसाला बेरोजगार करण्याचे आणि मुंबईबाहेर काढण्याचे काम संघटनांच्या माध्यमातून करणारे आज मराठी माणसाचा कैवार घेऊन पुढे येत आहेत. या पेक्षा मराठी माणसाची चेष्टा असू शकत नाही, असे ही भांडारी यावेळी म्हणाले. छोट्या मोठ्या उद्योग, व्यवसायांमध्ये खंडणी मागितली जाते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून उद्योजकांना आपला व्यवसाय चालवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे 50 उद्योजकांनी एकत्र येऊन या विरोधात राज्याचे गृहमंत्री राजन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दिली आहे. या खंडणीखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे. कारण तक्रारदारांनी पुरावे देण्याची तयारी दाखवली असून, यात 80 टक्के उद्योजक मराठी असल्याचे भांडारी यांनी स्पष्ट केले.

Loading Comments