Advertisement

गणेश विसर्जनानंतर आघाडी सरकारचंही विसर्जन- रामदास आठवले

महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याचं काही खरं नाही. श्रीगणेश विसर्जनानंतर महाविकास आघाडी सरकारचंही विसर्जन होईल आणि महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.

गणेश विसर्जनानंतर आघाडी सरकारचंही विसर्जन- रामदास आठवले
SHARES

महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याचं काही खरं नाही. श्रीगणेश विसर्जनानंतर महाविकास आघाडी सरकारचंही विसर्जन होईल आणि महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल, असा दावा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आ) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. (maha vikas aghadi government will collapse after ganesh festival says rpi chief ramdas athawale)

तिन्ही पक्षातील अंतर्गत वाद, शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे अजित पवार यांची नाराजी यावर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले की, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास नीट होत नसल्याने अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. पार्थ पवार हे तरूण असून त्यांची मागणी रास्त अशीच आहे. परंतु राज्यातील सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस देखील सहभागी असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ही भूमिका अडचणीची वाटली. त्यावरून त्यांनी पार्थ पवार यांना कडक शब्दांत सुनावलं. शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे अजित पवार नाराज असण्याची शक्यता आहे. याआधीही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे नाराज अजित पवार केव्हाही सरकारबाहेर पडू शकतात, अशी शक्यता रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - आधी स्वत:चा पक्ष सांभाळा, आशिष शेलारांचा राष्ट्रवादीला टोला

शिवाय राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही अंतर्गत बंडाळी सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संकटकाळात भलेही गणेशोत्सव नेहमीसारख्या जोशात साजरा होत नसला, तरी गणेश विसर्जन नक्कीच होणार आहे. त्याचप्रमाणे गणेश विसर्जनानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचंही विसर्जन होणार आहे. त्यानंतर महायुतीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेत येईल, असा दावा रामदास आठवले यांनी केला.

केंद्रातलं सरकार कोसळेल हा दावा संजय राऊत करत असले, तरी या दाव्यात काहीच तथ्य नाही. केंद्रातलं सरकार हे बहुमतातलं सरकार आहे. त्यामुळे ते पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट महाराष्ट्रातील सरकार पडण्याची भीती वाटत असल्याने संजय राऊत असं वक्तव्य करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२३ मध्येही भाजपचंच सरकार केंद्रात येईल. संजय राऊत भलेही सामनाचे संपादक असतील, पण मोदींशी सामना करण्याची त्यांची क्षमता नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेतेच फुटून हे सरकार पाडतील, अशी शक्यता आहे, असंह रामदास आठवले म्हणाले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement