Advertisement

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपही आखाड्यात

या निवडणुकीत भाजपनेही लढत द्यायचं ठरवलं असून मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभेत महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध केल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष विधानसभा अध्यक्षांच्या निवडीकडे लागलं आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपही आखाड्यात
SHARES

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडं राहणार की राष्ट्रवादी काँग्रेसकडं हा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. कारण काँग्रेसकडून नाना पाटोले यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपनेही लढत द्यायचं ठरवलं असून मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभेत महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध केल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष विधानसभा अध्यक्षांच्या निवडीकडे लागलं आहे.

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेत विश्वासठर्शक ठरावावर मतदान घेण्यात आलं. हा ठराव महाविकास आघाडी सरकारने १६९ विरून ० अशा फरकाने जिंकला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या. ही जागा काँग्रेस लढवणार की राष्ट्रवादी अशा चर्चाही सुरू होत्या.

हेही वाचा- ठाकरे सरकार जिंकले, विश्वासदर्शक ठराव १६९ विरूद्ध ० मतांनी मंजूर

त्यानुसार विधीमंडळ कामकाजाचा अनुभव असलेले आमदार नाना पाटोले काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीत उभे राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

तर, भाजपकडून किसन कथोरे यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही स्पष्ट केलं. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडंच राहील. काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदासाठी तीन-चार नावं सुचवली होती. त्यापैकी कुठलंही एक नाव निवडा, आमची कुठलीही हरकत नाही. असं आम्ही त्यांना सांगितल्याचंही ते म्हणाले.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा