Advertisement

युतीच्या गटांगळ्या? अमित शहांचा मुंबई दौरा रद्द

शहा यांनी दौरा रद्द केल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती होण्याची शक्यता कमी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

युतीच्या गटांगळ्या? अमित शहांचा मुंबई दौरा रद्द
SHARES

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २६ सप्टेंबर रोजी होणारा नियोजीत मुंबई दौरा रद्द झाला आहे. शहा यांनी दौरा रद्द केल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती होण्याची शक्यता कमी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घोडं अडलं

निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊन देखील युतीच्या जागा वाटपाचा घोळ अद्याप सुरूच आहे. शिवसेना १३५ जागांवर अडून बसल्याने तसंच भाजप शिवसेनेला ११० जागांच्या वर एकही जागा देण्यात तयार नसल्याने चर्चेची गाडी अडकल्याचं म्हटलं जात आहे. 

बहुमताचं सरकार

रविवारी मुंबईत आलेल्या अमित शहा यांनी महाराष्ट्रात पुन्हा भाजपचंच बहुमताचं सरकार येणार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असं वक्तव्य केलं होतं. शहा यांनी केलेल्या भाषणात शिवसेनेचा उल्लेख कुठंही न केल्याने भाजप स्वबळावर निवडून येण्याची भाषा करत शिवसेनेवर दबाव टाकत असल्याची चर्चा रंगली होती. 

युतीवर प्रश्नचिन्ह

परंतु चर्चेतून आहीच निष्पण्ण होत नसल्याने दोन्ही पक्षांच्या खासकरून शिवसेनेच्या नेत्यांकडून परस्परविरोधी वक्तव्य करण्यात येत नसल्याने शहा यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं होतं. २६ सप्टेंबरला युतीवर हमखास तोडगा निघेल, असंही म्हटलं जात होतं. मात्र शहांनी हा दौरा रद्द केल्याने युतीच्या भवितव्यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

२७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून अर्ज भरण्याची शेवटची मुदत ४ आॅक्टोबर आहे. 



हेही वाचा-

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी मुंबईत

पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच, अमित शहांच्या वक्तव्यामुळं शिवसेना दबावात..?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा