Exit polls: राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहणार- जयंत पाटील

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अवघ्या काही तासांचाच अवधी उरलाय. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

SHARE

आकडे एकतर्फी

एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना युतीचं सरकार येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असला, तरी

हा अंदाज मतदारांची मानसिक तयारी करण्यासाठी केला जात आहे, असं मत पाटील यांनी व्यक्त केलं. एक्झिट पोलच्या माध्यमातून केवळ एकच बाजू वरचढ दाखवली जात आहे, त्यामुळे एक्झिट पोलच्या निकालात काहीतरी गडबड असल्याचा दावाही त्यांनी केला. 

उत्स्फूर्त प्रतिसाद

एवढंच नाही, तर निवडणूक आयोग सरकारच्या म्हणण्याप्रमाणे वागत असून जनतेच्या मनातील शंका दूर झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. शरद पवार यांच्या सभांना यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहील, असा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला. हेही वाचा-

यापुढं निवडणूकच लढवणार नाही, हितेंद्र ठाकूर यांची घोषणा

Exit Polls: निकाल मनसे, वंचितची निराशा करणारे?संबंधित विषय
ताज्या बातम्या