Advertisement

यापुढं निवडणूकच लढवणार नाही, हितेंद्र ठाकूर यांची घोषणा

काही जणांकडून वसई तालुक्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्यात येत असल्याने यापुढं कुठलीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

यापुढं निवडणूकच लढवणार नाही, हितेंद्र ठाकूर यांची घोषणा
SHARES

काही जणांकडून वसई तालुक्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्यात येत असल्याने यापुढं कुठलीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.  

 मार्गदर्शन करणार

हितेंद्र ठाकूर पुढं म्हणाले की, यंदाची विधानसभा निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक असेल. असं असलं, तरी मी राजकीय संन्यास घेणार नाही. बहुजन विकास आघाडीच्या कामात सक्रीय राहून पालघरमधील रहिवाशांचे प्रश्न सोडवत राहीन. तसंच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शन करत राहणार असल्याचं ते म्हणाले.

कडवं आव्हान

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर वसईतून, तर त्यांचे चिरंजीव क्षितीज ठाकूर नालासोपाऱ्यातून उभे आहेत. नालासोपारातून शिवसेनेने क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना रिंगणात उतरवलं आहे. तर वसईतून महायुतीचे उमेदवार विजय पाटील यांनीही हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात कडवं आव्हान निर्माण केलं आहे. 

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीकडून ठाकूरांवर तीव्र शब्दांत टीका केली होती.

हेही वाचा-

प्रदीप शर्मांनी दिली निवडणूक अधिकाऱ्याला धमकी

मला हरवण्यासाठी ठाकरे कुटुंबाला पैसा खर्च करावा लागला, अभिजीत बिचकुलेचा आरोप

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा