Advertisement

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेला झटका, २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांचे राजीनामे

तिकीट वाटपाच्या नाराजीवरून शिवसेनेच्या कल्याण-डोंबिवलीतील २६ नगरसेवकांसह अंदाजे ३०० कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याने शिवसेना-भाजप महायुतीपुढील अडचणी वाढल्या आहेत.

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेला झटका, २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांचे राजीनामे
SHARES

तिकीट वाटपाच्या नाराजीवरून शिवसेनेच्या कल्याण-डोंबिवलीतील २६ नगरसेवकांसह अंदाजे ३०० कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याने शिवसेना-भाजप महायुतीपुढील अडचणी वाढल्या आहेत.

म्हणून नाराज

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेची चांगली पकड असूनही इथं भाजपचा उमेदवार देण्यात आल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे. शिवसेनेचे स्थानिक नेते धनंजय बोडारे यांच्या ऐवजी  भाजपचे गणपत गायकवाड यांना इथून उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाय शिवसैनिकांना त्यांचा प्रचार करण्यासही सांगण्यात आलं आहे. यामुळे नाराज २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे दिले आहेत.  

उमेदवाराला विरोध

यामुळे कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. या राजीनाम्यामुळे केवळ शिवसेनाच नाही, तर भाजपसमोरील अडचणी देखील वाढल्या आहेत. कारण भाजपच्या उमेदवाराला स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधाला सामोरे जावं लागणार आहे.

हेही वाचा-

आदित्य ठाकरेंविरोधात लढणाऱ्या उमेदवाराची संपत्ती 'एवढी'!

म्हणून गेलो होतो, संघाच्या कार्यक्रमाला, नितेश राणे यांचा खुलासा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा