Advertisement

राज ठाकरेंविरोधात इतकाच राग असेल, तर मनोज तिवारींनी सुरक्षेशिवाय इथं फिरून दाखवावं- विनय दुबे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी इतकाच राग असेल तर सुरक्षेशिवाय इथल्या रस्त्यांवर फिरून दाखवावं, असं आव्हान उत्तर भारतीय महापंचायतीचे अध्यक्ष विनय दुबे यांनी तिवारींना दिलं.

राज ठाकरेंविरोधात इतकाच राग असेल, तर मनोज तिवारींनी सुरक्षेशिवाय इथं फिरून दाखवावं- विनय दुबे
SHARES

भाजपचे नेते खासदार मनोज तिवारी यांनी महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा जराही प्रयत्न करू नये, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी इतकाच राग असेल तर सुरक्षेशिवाय इथल्या रस्त्यांवर फिरून दाखवावं, असं आव्हान उत्तर भारतीय महापंचायतीचे अध्यक्ष विनय दुबे यांनी तिवारींना दिलं. 

काय म्हणाले होते तिवारी?

नवी मुंबईतल्या ऐरोली सेक्टर १७ इथं भाजपने हिंदी भाषिकांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला खा. मनोज तिवारी उपस्थित होते. या मेळाव्यात भाषण करताना प्रांतवादाचं राजकारण करणाऱ्या पक्षांनी हिंदी भाषिकांना मारहाण केली. त्यांचे ठेले, गाड्या तोडल्या. तेव्हा मी फक्त एक कलाकार होतो. पण रस्त्यावर उतरून या कृत्याचा निषेध केला. त्यावेळी गणेश नाईक यांनी मुंबईत सहकार्य केल्याचं तिवारी म्हणाले. 


आव्हान दिलं

त्याला फेसबुकवरील व्हिडिओद्वारे उत्तर देताना विनय दुबे म्हणाले की, मनसे महाराष्ट्राच्या विकासासाठी भूमिका घेते. मुंबई शांत असताना तुम्ही विनाकारण तणाव का निर्माण करत आहात. राज ठाकरेंनी उत्तर भारतीय महापंचायतीच्या कार्यक्रमात येऊन हिंदी भाषिकांविषयी आधीच भूमिका जाहीर केली आहे. मनसेच्या अनेक नेत्यांनी हिंदी भाषिकांना मदत केली आहे. तसंच राज ठाकरे राज ठाकरे यांच्याविषयी इतकाच राग असेल तर सुरक्षेशिवाय इथल्या रस्त्यांवर फिरून दाखवावं, असं म्हणत तिवारी यांना आव्हान दिला.हेही वाचा-

इंजिनदादा इंजिनदादा किती आवाज करता; भाजपची राज ठाकरेंवर टीका

भाजपा-शिवसेना राज्यात ताटं वाट्या घेऊन फिरतेय- राज ठाकरेसंबंधित विषय
Advertisement