महायुतीला २२० मॅजिक फिगर गाठता येणार नाही, सट्टेबाजांचा अंदाज

महाराष्ट्रासह हरियानामध्येही विधानसभा निवडणूक होत आहे. दोन्ही राज्यांतील निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपसमोर सत्ता टिकवण्याचे तर काँग्रेससमोर अस्तित्व टिकवण्याचं आव्हान आहे.

SHARE
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात पुढील सरकार युतीचे असेल असा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे. मात्र, महाराष्ट्रात अमित शहा यांच्या मनातील युतीबाबतचा आकडा म्हणजे २२० च्या पुढे युतीला जागा मिळणार नसल्याचा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे. 

 महाराष्ट्रासह हरियानामध्येही विधानसभा निवडणूक होत आहे. दोन्ही राज्यांतील निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपसमोर सत्ता टिकवण्याचे तर काँग्रेससमोर अस्तित्व टिकवण्याचं आव्हान आहे. बंडखोरांमुळे भाजपला त्यांची मॅजिक फिगर २२०  गाठताना दमछाक होऊ शकते, असा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे. दोन्ही राज्यातील निवडणुकांवर  ३० हजार कोटी रुपयांचा सट्टा लागला आहे. राज्यात महायुतीला २८८ पैकी २१० ते २१५ जागा  मिळण्याचा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे. तर काँग्रेस - राष्ट्रवादीला जवळपास ५५ ते ६० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एमआयएम आणि मनसेला एक किंवा दोन जागांवर समाधान मानावं लागेल.


महाराष्ट्रातील सट्टा दर

 भाजपा                               शिवसेना                  काँग्रेस                 राष्ट्रवादी काँग्रेस
100 जागा–18 पैसे         65 जागा–22 पैसे            10 जागा–15 पैसे         10 जागा–20 पैसे
105 जागा–38 पैसे         70 जागा–47 पैसे            15 जागा–38 पैसे        15 जागा–42 पैसे
110 जागा–62 पैसे          75 जागा–1 रुपया            20 जागा–67 पैसे        20 जागा–80 पैसे
115 जागा–1 रुपया           80 जागा–1.55 रु.          25 जागा–1.38 रु.        25 जागा–2 रु.
120 जागा–1.60 रुपया     85 जागा–3 रु.              30 जागा–2.50 रु.       30 जागा–3.50 रु.


महाराष्ट्रसोबतच हरियाणामध्येही विधानसभा निवडणूक होत आहे. हरियाणात भाजपा सत्तेमध्ये येणार असल्याचा सट्टा बाजाराच्या बुकींचा अंदाज आहे. येथे भाजपाला जवळपास ७५ जागा तर काँग्रेसला २० जागा मिळतील असा सट्टेबाजाराचा अंदाज आहे. 

हरियाणातील सट्टा दर

भाजपा                                              काँग्रेस
55 जागा – 20 पैसे                        5 जागा– 35 पैसे
60 जागा – 32 पैसे                        10 जागा – 1 रुपया
65 जागा – 68 पैसे                        15 जागा – 3.50 रुपया
70 जागा – 1 रुपया                         20 जागा– 5 रुपया
75 जागा– 2.50 रुपया

सट्टा लावणं हे जरी कायद्याने गुन्हा असला तरी, देशभरात हजारो कोटींचा सट्टा प्रत्येक निवडणुकीत लावला जातो हे सत्य आहे. सध्या बुकी हे आॅनलाईन असल्याने त्यांचा हा अनधिकृत धंदा हाय टेक झाला आहे. म्हणून परदेशात आणि काही बुकी तर थेट पाकिस्तानमध्ये बसून ह्या निवडणुकीवर सट्टा लावत आहेत .

निवडणुकीत घवघवीत यश मिळवून सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येक पक्ष धडपडत असतो. मात्र बुकींचा हेतू सट्टा लावून पैसे कमवायचा असतो. म्हणून निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सट्टा बाजार सज्ज झाला आहे . प्रत्येक पक्षाला मिळणाऱ्या जागा किती असतील ह्यावर कोट्यवधींचा सट्टा लावला गेला असला तरी कुठल्या पक्षाला किती जागांवर विजय मिळणार हे शेवटी जनताच निश्चित करणार आहे.


संबंधित विषय
ताज्या बातम्या