सस्पेन्स वाढला, राष्ट्रवादी-काँग्रेसची बैठक रद्द

महाराष्ट्रातील सरकार स्थापनेसंदर्भात बोलणी करण्यासाठी ​काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या​​​ ज्येष्ठ नेत्यांची मंगळवारी होणारी नियोजीत बैठक रद्द करण्यात आली आहे.

SHARE

महाराष्ट्रातील सरकार स्थापनेसंदर्भात बोलणी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची मंगळवारी होणारी नियोजीत बैठक रद्द करण्यात आली आहे. यामुळे दिल्लीत शंका कुशकांना पेव फुटलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीत केवळ महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही, असं वक्तव्य पवार यांनी केलं होतं. यावरून गोंधळात भर पडली होती. त्यातच ही बैठक बुधवारपर्यंत पुढं ढकलण्यात आली आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची मंगळवारी जयंती असल्याने विविध कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे नेते व्यस्त आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये होणारी बैठक रद्द करून ती बुधवारी ठेवण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.  हेही वाचा-

सरकार स्थापनेचा गाेंधळ फक्त मीडियाच्या मनात, संजय राऊत यांचा टोला

शिवसेना एकटी पडली, शरद पवारांचं घुमजाव?संबंधित विषय
ताज्या बातम्या