यंदाच्या विधानसभा निवडणुकीत २३ महिला आमदार विजयी


यंदाच्या विधानसभा निवडणुकीत २३ महिला आमदार विजयी
SHARES

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मोजणीवेळी जनतेनं यंदा २३ महिलांना निवडून दिलं आहे. मात्र, महिला  विजयी उमेदवारांचा टक्का यावेळी कमीच असून, यामध्ये ११ विद्यमान आमदारांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा एकूण ३ हजार २३७ उमेदवार उतरले होते. त्यामध्ये २३५ महिला उमेदवारांना विविध राजकीय पक्षांनी संधी दिली होती.

यंदाच्या निवडणुकीत ११  विद्यमान आमदार पुन्हा विजयी झाल्या आहेत त्यात मंदा म्हात्रे (बेलापूर), मनीषा चौधरी (दहिसर), विद्या ठाकूर (गोरेगाव), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), माधुरी मिसाळ (पर्वती) मोनिका राजळे (शेवगाव), भारती लव्हेकर (वर्सोवा) यांचा समावेश आहे. या आठही भाजपच्या आमदार आहेत. तसंच, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) यशोमती ठाकूर (तिवसा) आणि वर्षा गायकवाड (धारावी-मानखुर्द) यांनी पुन्हा एकदा आपापल्या मतदारसंघातून दिमाखात विजय मिळवला आहे.

प्रथमच विधानसभेत निवडून जाणाऱ्या महिला आमदारांमध्ये राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे (देवळाली), शिवसेनेच्या लता सोनावणे (चोपडा) आणि यामिनी जाधव (भायखळा), भाजपच्या मुक्ता टिळक (कसबा पेठ), श्वेता महाले (चिखली), मेघना बोर्डीकर (जिंतूर), नमिता मुंदडा (केज), काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर (वरोरा) व सुलभा खोडके (अमरावती) यांचा समावेश आहे. गीता जैन (मिरा भाईंदर) आणि मंजुळा गावित (साक्री) या दोन अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजयी झाल्या आहेत.


हेही वाचा -

Maharashtra Assembly Elections 2019: दक्षिण मुंबईत युतीचं वर्चस्व

शिवसेनेचे 'हे' उमेदवार केवळ ४०९ मतांनी विजयसंबंधित विषय