Advertisement

Maharashtra Assembly Elections 2019: दक्षिण मुंबईत युतीचं वर्चस्व


Maharashtra Assembly Elections 2019: दक्षिण मुंबईत युतीचं वर्चस्व
SHARES

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांनी बाजी मारली तर काही ठिकाणी कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. परंतु, दक्षिण मुंबईत पुढील ५ वर्ष आता युतीचंच वर्चस्व असणार आहे. कारण ६ पैकी ५ जागांवर भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्यानं विजयी झालं आहेत.

भायखळ्यात एमआयएमच्या मुंबईतील एकमेव आमदाराचा पराभव केला. कुलाबा मतदारसंघात भाजपनं राज पुरोहित यांच्याऐवजी राहुल नार्वेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. नार्वेकर यांनी ५७,४२० मतं मिळवत एकहाती विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे भाई जगताप यांचा पराभव केला. भाई जगताप यांना ४१,२२५ मतं मिळाली तर वंचितच्या जितेंद्र कांबळे यांच्या पदरात ३,०११ मते पडली.

काँग्रेसचे विद्यमान आमदार आमीन पटेल यांनी ५८,९५२ मतं घेत शिवसेनेच्या पांडुरंग सकपाळ यांचा २३,६५५ मतांनी पराभव केला. मलबार हिल मतदार संघात भाजपचाच पगडा भारी आहे. या मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा निवडून आले आहेत. लोढा यांच्यासमोर प्रतिस्पर्धीच नसल्यानं त्यांना ९३,५३८ मते मिळालेली तर काँग्रेसच्या हिरा देवासी यांना २१,६६६ मते मिळाली.

भायखळा मतदारसंघात शिवसेना, अखिल भारतीय सेना, एमआयएम आणि काँग्रेसनं उमेदवार उतरवले होते. यांच्यात झालेल्या या लढतीत शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी ५१,१८० मते मिळवून बाजी मारली. मुंबईत एमआयएमचा एकमेव आमदार असलेल्या वारिस पठाण यांचा त्यांनी २०,०२३ मतांनी पराभव केला. पठाण यांना ३१,१५७, काँग्रेसचे मधू चव्हाण २४,१३९ तर अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांना १०,४९३ मते मिळाली.

वरळी मतदारसंघाकडे यंदा सर्वांच्या नजरा होत्या. विद्यमान आमदार सुनील शिंदे यांच्याऐवजी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे वरळीतून लढले. आदित्य ठाकरे यांना ८९,२४८ मते मिळाली तर त्यांच्यासमोर निवडणूक रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादीच्या सुरेश माने यांच्या पदरात २१,८२१ मते पडली. शिवडीमध्ये दरवेळेप्रमाणे यावेळीही शिवसेनचाच दबदबा दिसून आला. शिवसेनेचे अजय चौधरी ७७,६८७ मते मिळवत यांनी एकहाती विजय मिळवला. येथे ३८,३५० मतांनी मनसेचे संतोष नलावडे दुसऱ्या स्थानावर गेले.



हेही वाचा -

Maharashtra Assembly Elections 2019: मुंबईत 'इतकी' नोटा मतं

शिवसेनेचे 'हे' उमेदवार केवळ ४०९ मतांनी विजय



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा