Advertisement

'यामुळं' सारा तेंडुलकरनं नाही केलं मतदान


'यामुळं' सारा तेंडुलकरनं नाही केलं मतदान
SHARES

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात सोमवारी मतदान झालं. यंदा मतदानाची टक्केवारीत घट झाली असून, महाराष्ट्रात सरासरी ६०.४६ टक्के मतदान झालं. दरम्यान, मतदाना दिवशी अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. मुंबईसह राज्यभरातील ज्येष्ठ नागरिकांसह सेलिब्रिटीजनं घराबाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासह खेळाडूंनीही मतदान केलं. यामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकरनं पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनसहीत मतदानाचा हक्क बजावत मतदान करण्याचा आवाहनं केलं.

वांद्र्यात मतदान

सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सचिन तेंडुलकरन वांद्र्यातील मतदान केंद्रात मतदान केलं. मतदानानंतर त्यांनं यासंदर्भात फेसबुकवर फोटोही पोस्ट केला. त्यावेळी पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनबरोबरच्या फोटोत सचिन बोटाला लावलेली मतदानाची शाई दिसत आहे. तसंच, 'मतदान करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. माझं मत मी नोंदवलं आहे, आपण सर्व सुद्धा मतदान करून या लोकशाहीच्या सोहळ्याचा भाग व्हा', असा संदेश या फोटोबरोबर सचिननं पोस्ट केला होता.



लंडनमध्ये शिक्षण

दरम्यान, सचिन, पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुन यांनी मतदान केलं. परंतु, मुलगी सारा तेंडुलकर मतदानाला आली नव्हती. सारा कुठं आहे असा सवाल अनेकांनी सोशल मीडियावर विचारला. त्यावेळी सारा परदेशात असल्यानं ती मतदानाला येऊ शकली नाही. सारा सध्या लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. त्यामुळं तिला मतदानासाठी मुंबईमध्ये येता आले नाही.



हेही वाचा -

EVM वर शाई फेकणाऱ्याला जामिन

PMC बँक घोटाळा : माजी संचालक सुरजीत सिंह अरोराच्या पोलिस कोठडीत वाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा