Advertisement

''महावसुली" आघाडीनं पुकारलेल्या बंदला शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या "दादर" मध्येच प्रतिसाद नाही; भाजपचा सेनेला टोला

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महारष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे.

''महावसुली" आघाडीनं पुकारलेल्या बंदला शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या "दादर" मध्येच प्रतिसाद नाही; भाजपचा सेनेला टोला
SHARES

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महारष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. सत्ताधारी शिवसेना, कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षानं हा बंद पुकारला आहे. त्यामुळं सोमवारी सकाळपासून मुंबईसह राज्यातील दुकानं बंद करण्यात आली आहे. या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी उत्स्फुर्तपणे व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला आहे. तर काही ठिकाणी सर्व व्यवहार सुरळीत असल्याचं दिसून येत आहे.

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर भाजपानेही सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका सुरु केली आहे. दादरमध्ये भाजी मार्केट सुरूच असल्याचं माध्यमांमध्ये दाखवण्यात आलं होतं. आता हाच धागा पकडत भाजपानं शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. 'महावसुली" आघाडीनं पुकारलेल्या बंदला शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या "दादर" मध्येच प्रतिसाद नाही, आम्ही हप्ते देतो तर बंद का पाळायचा भाजी वाल्यांचे चोख प्रत्युत्तर आहे', असं भाजपाचे नेते डॉ. संजय कुंटे यांनी म्हटलं.

अतीवृष्टी, महापूर, वादळ यानं संकटात सापडलेला राज्यातील शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहात असताना प्रत्यक्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यास उद्ध्वस्त करण्याचा डाव राज्य सरकारचा आहे. १०५० कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्यानं लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे हे तर हीन राजकारण महाविकासआघाडी सरकार खेळत आहे. लखीमपूरची चर्चा करूच पण इथल्या शेतकऱ्यांना मदत कधी देणार असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारला विचारला आहे.

बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला बंद करुन आपलं दुकान चालवले त्या तथाकथित"बंदसम्राटांचा" पुन्हा आज इतिहास आठवा. मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उध्वस्त केले. युनियनच्या नावानं कारखाने बंद करुन कष्टकरी, श्रमिकांना देशोधडीला लावले. एवढेच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरलेय. कोस्टल रोडला विरोध, नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध, मेट्रोचेही हे विरोधकच. हे तर विकासातील गतीरोधक! बंद आणि विरोध यांचा "धंदा" गोळा होतो त्यावरच "चंदा अशा शब्दात भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा