Advertisement

मॉब लिचिंग करून किरीट सोमय्यांच्या हत्येचा प्लान होता - चंद्रकांत पाटील

याप्रकरणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे.

मॉब लिचिंग करून किरीट सोमय्यांच्या हत्येचा प्लान होता - चंद्रकांत पाटील
SHARES

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेमध्ये हल्ला झाला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरुन सनसनाटी आरोप केला आहे.

याप्रकरणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मॉब लिचिंग करून किरीट सोमय्या यांची हत्या करायचा कट होता, असा गंभीर आरोप केला आहे. यामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला हा एक जाणीवपूर्वक रचलेला कट असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. तसंच याप्रकरणी आता केंद्रानं जातीनं लक्ष घालावे आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

हल्ल्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. यासोबतच त्यांनी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवर देखील सवाल उपस्थित केले आहेत. याप्रकरणी आता NIA चौकशी करुन हल्ल्याप्रकरणातील दोषींवर कारवाई केली जावी मागणी त्यांनी केली.

चंद्रकांत पाटलांनी पत्रात लिहिले की, सत्तेचा दुरुपयोग करून बंगाल आणि केरळसारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण केली जात आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शाह यांनी महाराष्ट्रात लक्ष केंद्रीत करावे. केंद्रीय मंत्री नारायण राणे एक वाक्य बोलले तर त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला. त्यांना अटक देखील करण्यात आली. नितेश राणेंचा हत्या प्रकरणासोबत कथित संबंध नव्हता तरी देखील त्यांना अटक करण्यात आली. अमित शाहांनी महाराष्ट्राच्या डिजीला विचारणा करावी, की असे कसे घडलेय? किरीट सोमय्यांवर हल्ला झाला त्यावेळी केंद्रीय सुरक्षा दलाच्या पोलिसांना देखील धक्काबुक्की करण्यात आली होती. सरकारी कामात व्यत्यय आणण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केलीच पाहिजे. असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या घाेटाळाप्रकरणी पुणे मनपा आयुक्तांची भेट घेण्याकरिता किरीट सोमय्या पाच फेब्रुवारी रोजी पुणे मनपात आले होते. त्या वेळी जुन्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिवसैनिकांनी त्यांचा रस्ता अडवून धक्काबुक्की केली. यात साेमय्या पायऱ्यांवर पडून जखमी झाले होते.


हेही वाचा

अण्णा हजारे 'या' कारणामुळे करणार बेमुदत उपोषण

भाजप आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा