Advertisement

भाजप आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

भाजप आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर
SHARES

भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयानं ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात (Shivsainik Santosh Parab attack case) नितेश राणे यांना न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 

तब्येत अस्वस्थ असल्यानं त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी (८ फेब्रुवारी २०२२) पुन्हा एकदा नितेश राणेंच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी पार पडली. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर बुधवारी न्यायालयानं आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.

नितेश राणे यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना सांगितले की, नितेश राणे हे पूर्वापासूनच या प्रकरणात पोलिसांना तपासात सहकार्य करत आहेत. नितेश राणे यांची पोलीस कस्टडीत ४८ तास चौकशी झाली. यावेळी नितेश राणे यांच्या तब्येतीबाबतही वकिलांनी न्यायालयाला माहिती मंगळवारी (८ फेब्रुवारी) दिली.

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात मागणी केली की, तपास अजून पूर्ण झालेला नाही. कोर्टात चार्जशीट दाखल नाही त्यामुळे जर नियमित जामीन मंजूर झाल्यास हल्ला प्रकरणात (तपासात) अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे जामीन मंजूर करू नये.

तर, गंभीर स्वरूपाची जखम नसल्याचं माने शिंदे यांनी म्हटलं होतं. मात्र संतोष परब यांना गंभीर स्वरुपाची जखम होती. छातीवर गंभीर जखमी करून मारण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला. अंगावर गाडी घालून पाडल्यावर संतोष परब यांच्या अंगावर मोटरसायकल पडली, संतोष परब यांच्या अंगावर गाडी पडल्यानंतर ती गाडी बाजूला न करता त्यांच्या डाव्या बाजूला छातीवर चाकूने हल्ला करणं हा पूर्वनियोजित कट आल्याचा युक्तीवाद प्रदीप घरत यांनी केला.

नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पण जेलमध्ये न जाता नितेश राणे यांनी प्रकृती अवस्थेचे कारण देत सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. छातीत दुखत असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.

त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील तुळशी इमारतीमध्ये दाखल करण्यात आलं आहे. नितेश राणे यांच्यावर उपचार करण्यासाठी सीपीआर रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार केली आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय अधिकार्‍यांचा समावेश आहे. विशेषतः हृदयरोग, अस्थिरोग तज्ञ यांचाही समावेश यात केलेला आहे.



हेही वाचा

अण्णा हजारे 'या' कारणामुळे करणार बेमुदत उपोषण

पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा अपमान करणं दुर्देवी- सुप्रिया सुळे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा