Advertisement

पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा अपमान करणं दुर्देवी- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी ''महाराष्ट्राबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वेदना झाल्या. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचा अपमान करणं हे दुर्देवी'', असं म्हटलं

पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा अपमान करणं दुर्देवी- सुप्रिया सुळे
SHARES

कोरोनाच्या पहिल्या लाटेतील लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसने मुंबईत स्थलांतरित मजुरांना रेल्वेची मोफत तिकिटे देऊन उत्तर प्रदेश, बिहारमध्ये परत जाण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच त्या राज्यांमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरला अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील सत्ताधारी पक्षाकडून टीका केली जात आहे. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी ''महाराष्ट्राबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वेदना झाल्या. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचा अपमान करणं हे दुर्देवी'', असं म्हटलं

मुंबईसह देशभरात आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनामुळं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अर्थचक्र ठप्प झालं होते. शिवाय, अनेक परराज्यातील कामगारांनी आपल्या घरची वाट धरली. सुरूवातीच्या काळात कोरोना देशभरात पसरला, मात्र हा कोरोना महाराष्ट्रा कॉंग्रेसमुळं पसरला असल्याचं वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदींनी एक तासाहून अधिक केलेल्या भाषणात काँग्रेसवर टीका आणि आरोपांचा भडिमार केला. 'कोरोनाच्या पहिल्या लाटेत देश लॉकडाऊचं पालन करत असताना महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मात्र मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर उभे राहून मुंबई सोडून जाणाऱ्या मजुरांना रेल्वेची तिकिटे देत होते. त्यांनी लोकांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

नरेंद्र मोदी यांच्या या विधानानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मंगळवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वेदना झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना देखील वाईट वाटलं. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचा अपमान करणं हे दुर्देवी, असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

'श्रमिक ट्रेन सोडल्याबद्दल महाराष्ट्रातील भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आभार मानले होते. तसेच श्रमिक ट्रेन राज्यांनी नव्हे, तर केंद्र सरकारने सोडल्या होत्या', अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी करुन दिली. शिवाय, कोरोनाच्या महामारीमध्ये आपण माणुसकी विसरलो का, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला.

''मला स्वतःला वैयक्तिकपणे दुःख देणारी गोष्ट. ज्या राज्यानं फुल न फुलाची पाकळी म्हणा. पण १८ खासदार भाजपला महाराष्ट्रानं निवडून दिले आहेत. म्हणजे, मोदींना पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्रातील मतदारांचा मोठा वाटा आहे. त्या महाराष्ट्राच्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान कोविड सुपर स्प्रेडर म्हणून त्यांनी केला. हे अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे'', असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा