Advertisement

सरकारच्या कामांची 'अनावश्यक' प्रसिद्धी, ३०० कोटी उधळल्याचा खा. अशोक चव्हाण यांचा आरोप


सरकारच्या कामांची 'अनावश्यक' प्रसिद्धी, ३०० कोटी उधळल्याचा खा. अशोक चव्हाण यांचा आरोप
SHARES

सरकारच्या कामाची व धोरणांची प्रसिद्धी करण्यासाठी सरकारकडे स्वतंत्र माहिती व जनसंपर्क विभाग कार्यरत असताना जनतेच्या खिशातील ३०० कोटी रुपये खर्चून सरकारच्या प्रसिद्धीचे काम खासगी कंपन्यांना कशासाठी? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारला केला आहे.


जनतेत रोष

सध्याच्या सरकारने निवडणुकीपूर्वी अनेक खोटी आश्वासने देऊन 'अच्छे दिन'ची स्वप्ने दाखविली होती. परंतु सत्तेत येताच या आश्वासनांचा सरकारला सोयीस्कररित्या विसर पडला. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनतेत तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून, परिणामी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनता सरकारविरोधात आपला रोष व्यक्त करीत आहे.


सोशल मीडियाचा धसका

सरकारने सोशल मीडियाचा चांगलाच धसका घेतला आहे. या भितीतूनच सोशल मीडियावर सरकारविरोधात पोस्ट लिहणारे तरूण आणि पत्रकारांना नोटीसा पाठविल्या जात आहेत. परंतु अशा नोटीसा पाठवून सरकार जनतेचा आवाज दाबू शकत नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही युवकांच्या पाठीशी आहोत.

आज सरकारकडे माहिती व जनसंपर्क विभाग असताना, खासगी कंपन्यांना काम दिले आहे, यावरुन सरकारचा आपल्याच विभागाच्या कामावर विश्वास नसल्याचे दिसून येतो, एकीकडे सरकार जाहिरातींवर हजारो कोटी रुपये उधळत असताना पुन्हा नव्याने सरकारच्या प्रचारासाठी उधळपट्टी कशाला? असा सवाल चव्हाण यांनी सरकारला केला.



हेही वाचा -

भाजपाच्या परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू - चव्हाण



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा