भाजपाच्या परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू - चव्हाण


SHARE

लोकांमध्ये महागाई आणि जीएसटीबाबत रोष कायम आहे. या रोषातून सर्व पिचलेल्या जनतेने काँग्रेसला बहुमत दिलं. काँग्रेसचा हा विजय म्हणजे भाजपाच्या परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू झाल्याचं निदर्शक आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी नांदेड महापालिका निवडणुकीतील विजयावर प्रतिक्रीया दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत खा. चव्हाण बाेलत होते.

भाजपानं २०१४ मध्ये सोशल मीडियाचा वापर करून निवडणुका जिंकल्या. पण जनतेला त्यांच्या कारभारातील फोलपणा कळला आहे. म्हणूनच नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपाच्या खोट्या प्रचाराला, फोडाफोडीच्या राजकारणाला मतदार बळी पडले नाहीत. नांदेडमधील विजय हा काँग्रेससाठी अत्यंत मोठा विजय असल्याचंही यावेळी चव्हाण म्हणाले.


काय म्हणाले चव्हाण?

  • ईव्हीएममध्ये छेडछाड नाही म्हणूनच आम्ही मोठ्या फरकानं जिंकलो 
  • भाजपानं या निवडणुकीत अत्यंत खालच्या स्तरावर प्रचार केला
  • निवडणुकीआधी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले
  • भाजपाच्या जातीय ध्रुवीकरणाला लोकांनी नाकारलं
  • भाजपाची खोटी आश्वासनं आणि आमिषाला मतदार बळी पडले नाहीत
  • फोडाफोडीच्या राजकारणालाही नाकारलं
  • इंधनवाढ, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीबाबत लोकांमध्ये रोष
  • एमआयएम भाजपाला पर्याय ठरू शकत नाही
  • सोशल मीडियाचा वापर भाजपावरच उलटला
  • राणेंचे आभार की त्यांनी माझं अभिनंदन केलंडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय