Advertisement

“इंधन दरवाढीवर बोलण्याऐवजी विरोधक भावनिक राजकारणात व्यस्त”

देशात सातत्याने इंधनाचे दर वाढत असताना देखील महाराष्ट्रातील विरोधी पक्ष त्यावर आवाज न उचलता केवळ भावनिक राजकारणात व्यस्त असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

“इंधन दरवाढीवर बोलण्याऐवजी विरोधक भावनिक राजकारणात व्यस्त”
SHARES

देशात सातत्याने इंधनाचे दर वाढत असताना देखील महाराष्ट्रातील विरोधी पक्ष त्यावर आवाज न उचलता केवळ भावनिक राजकारणात व्यस्त असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) केली आहे.

इंधनाच्या दरात मागील काही महिन्यांपासून होत असलेल्या वाढीमुळे महाराष्ट्रातील (maharashtra) सर्वच महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोलचे दर शंभरी पार गेले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद इ. शहरातील पेट्रोलचे दर १०४ ते १०६ रुपये प्रति लिटरवर जाऊन पोहोचले आहेत. तर डिझेल देखील शंभरीच्या नजीक पोहोचलं आहे.

देशात ५ राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत आहे. आज जून महिन्यातील १६ वी दरवाढ नोंदविण्यात आली. पेट्रोलच्या दरात प्रती लिटर ३५ पैसे तर डिझेलच्या दरात प्रती लिटर २८ पैशांची दरवाढ करण्यात आली आहे. 

हेही वाचा- रिलायन्सनं गुगलसोबत मिळून लॉन्च केला जियोफोन नेक्स्ट, १० सप्टेंबरपासून होणार विक्री

या नव्या दरवाढीमुळे मुंबईत आता पेट्रोलचे दर प्रती लिटर १०४.९० रुपये झाले असून डिझेलचा दर प्रती लिटर ९६.७२ रुपयांवर पोहचला आहे. पेट्रोलने शंभरी पार केली असताना डिझेलचे दरही मागे न राहता आता शंभरीच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे जनतेला महागाईला सामोरं जावं लागतंय. सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले असतानाही केंद्रकडून कोणताही दिलासा दिला जात नसल्याचे चित्र आहे. राज्यातील विरोधी पक्षदेखील या महत्त्वाच्या प्रश्नावर आवाज न उचलता भावनिक मुद्द्यांचं राजकारण करण्यात व्यस्त आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर (bjp) निशाणा साधला आहे.

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशात दररोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती या क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. नवे दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. 

(maharashtra bjp leaders silent on fuel price hike criticized ncp)

हेही वाचा- Petrol - Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ चालूच


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा