Advertisement

Petrol - Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ चालूच

सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे.

Petrol - Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ चालूच
SHARES

पेट्रोल (petrol) आणि डिझेलच्या (diesel) दरात सतत होणाऱ्या वाढीने वाहनचालकांमध्ये मोठी नाराजी आहे. मात्र, तरीही भाववाढ सुरूच आहे. तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोलचे दर प्रतिलिटर ३५ पैशांनी वाढवले आहेत. तर डिझेल २८ पैशांनी महाग केलं आहे. 

या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर १०४.९० रुपये तर डिझेलचा दर ९६.७३ रुपये झाला आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९८.८१ रुपये आणि डिझेलची किंमत ८९.१८ रुपये प्रतिलिटर झाली आहे. 

सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोलच्या दरात ३५ पैसे तर डिझेलच्या दरात २६ पैशांची वाढ केली होती. त्यानंतर सोमवारी दर स्थिर होते.

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशात दररोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती या क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. नवे दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. 

मार्च महिन्यात १६ वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते. तर मे महिन्यात सलग ४ दिवस इंधनाची दरवाढ झाली होती. जानेवारीत १० वेळा आणि फेब्रुवारीमध्ये १६ वेळा पेट्रोल, डिझेल महागलं आहे. तर मार्चमध्ये ३ वेळा आणि एप्रिलमध्ये १ वेळा किमती कमी झाल्या आहेत. 

सध्या केंद्र सरकार पेट्रोलवर ३२.९८ प्रतिलिटर तर डिझेलवर ३१.८३ रुपये प्रतिलिटर कर आकारत आहे. तर महाराष्ट्र सरकार पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आणि डिझेलवर २१ टक्के व्हॅट लावते. तसंच यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर १० रुपये प्रतिलिटर, तर डिझेलवर ३ रुपये प्रतिलिटर इतका सेस लावण्यात येतो. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत.



हेही वाचा -

  1. पॅन कार्ड हरवलंय, खराब झालंय? असं मिळवा नवीन पॅन कार्ड

  2. रिलायन्सनं गुगलसोबत मिळून लॉन्च केला जियोफोन नेक्स्ट, १० सप्टेंबरपासून होणार विक्री
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा